Ads Area

maharashtra rain : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट तर मराठवाड्यासह विदर्भात यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात सध्या जोरदार पावसानं (Heavy Rain) धुमकूळ घातला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर कुठं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज या भागात पावसाची शक्यता

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महााष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर गडचिरोली, गोंदिया आणि नांदेडजिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अवर्ट जारी करण्यात आलाय. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्य्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आले आहेत. काही भागात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. खेडमधल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळं प्रशासन अलर्ट झालंआहे. जगबुडी नदीपात्राजवळ पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. तर नगर परिषदेचे कर्मचारी पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत. खेड तालुक्यातील पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे. त्यामुळे खेडच्या जगबुडी नदीला पूर आला आहे. या नदीमध्ये वास्तव्यास असलेल्या महाकाय मगरी पाण्याबाहेर येऊन मोकळ्या जागेवरती आलेल्या पाहायला मिळतात.

मुंबईत पावसाचा वाहतुकीवर परिणाम

मुंबईसह ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर पिरणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुंबईच्या अंधेरी सबवे खाली पाणी भरल्यामुळे अंधेरी बंद करण्यात आला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस

पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. धरण परिसरात सुरु असलेल्या पावसानं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सुरू करण्यात आला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारी धरणांच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सध्या चारीही धारणांमध्ये मिळून साडेअठरा टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात मोठं नुकसान

यवतमाळ जिल्ह्यात सततचा पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे कुणाच्या शेतातील पीक वाहून गेली आहेत तर कुणाची जमीन खरडून गेली आहे. जिल्ह्याच्या इतिहासातील हा सर्वात भयंकर पाऊस कोसळला आहे. दरम्यान सरकारनं  बाधितांना तातडीची सानुग्रह  10 हजारांची मदत जाहीर केली आहे. मात्र शेतपिकांच्या नुकसानीची आणि खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळेल याकडे लक्ष लागले आहे.

वाशिम जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका

वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले. पावसामुळे जिल्ह्यात 45 हजार 874 हेक्टरवरील पीक बाधित झाले असून  1 हजार 769 हेक्टर जमीन खरडून गेलीय. असा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. यात कपाशी ,सोयाबीन,तूर, उडीद आणि मुंग पिकाचे पुराच्या पाण्याने अतोनात नुकसान झालं आहे. तर बेलोरा येथे पुराचे पाणी गावात शिरले त्यात लोकांचे मोठे नुकसान झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/0lpEPHQ Flood : नोएडात जलप्रलय! शेकडो वाहने पाण्यात बुडाली, व्हिडीओ व्हायरल; पाहा

from maharashtra https://ift.tt/8pOfeV3

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area