<p>हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात जोरदार सरी बरसताहेत. संध्याकाळपासून ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे कोल्हापुरातील सर्वच नद्या दुथडी वाहताहेत. यंदा दुसऱ्यांदा पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 04 इंचांवर पोहोचली आहे. पाऊस थांबला नाही तर पंचगंगेची पाणी पातळी अधिक वाढण्याचा धोकाही संभवतोय. त्यामुळे पंचगंगेकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं दिलेत. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालाय.. त्यामुळे कोल्हापूरकरांनो गरज असेल तरच बाहेर पडा. </p> <p> </p> <p> </p>
from maharashtra https://ift.tt/9thika1
Kolhapur Panchganga Water Level : पंचगंगा नदीनं गाठली इशारा पातळी, जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली
July 23, 2023
0
Tags