17th July Headline : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास (Maharashtra Assembly Monsoon Session) आजपासून सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट असं एकूण 15 दिवसांसाठी असणार आहे. सकाळी 11 वाजता विधानसभा त्यानंतर दुपारी 2 वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येणार आहे. बंगळूरमध्ये विरोधकांची दुसरी बैठक पार पडणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये एकूण 26 विरोधी पक्ष उपस्थित राहणार आहेत. तर, सोमवती अमावस्येचा मुहूर्त साधून जेजुरी गडावर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान हे अधिवेशन असणार आहे. सकाळी 11 वाजता विधानसभा तर दुपारी 12 वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या बंडानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. राष्ट्रवादीचे किती आमदार अजित पवारांसोबत असणार, हे देखील या अधिवेशनात स्पष्ट होणार आहे.

बेंगळुरूत विरोधकांच्या आघाडीची बैठक

विरोधकांच्या दुसऱ्या बैठकीला आजपासून सुरु होणार आहे. बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन दिवसीय बैठकीला सुरूवात होणार आहे. दोन दिवसीय बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांकडून रणनीती आखण्यात येणार आहे. या बैठकीत 26 राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत.

सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत पालखी

सोमवती अमावस्येच्या निमित्ताने जेजुरी गडावर पालखी सोहळा पार पडणार आहे. या पालखी सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहणार आहेत.

राज्यात पुढील पाच दिवस मान्सूनचा इशारा

राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. मात्र राज्यात 18 जुलैपासून पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. कोकणाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत देखील काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पुण्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच विदर्भात पुढील 5 दिवस विजांसह पावसाचा अंदाज असून आज यलो अलर्ट जारी केला आहे.

मराठा समाजाचे आझाद मैदानावर आंदोलन

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरणार आहे. त्याचसंदर्भात आझाद मैदानावर मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

from maharashtra https://ift.tt/bWANQwn
17th July Headline : आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन, तर विरोधकांची बेंगळुरूत दुसरी बैठक पार पडणार; आज दिवसभरात
July 16, 2023
0
Tags