10th July Headline :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर असून उद्या ते अमरावती जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर राणा दाम्पत्याकडून अमरावतीमध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील मंत्र्यांची बैठक पार पडणार आहे. तर देशभरात अनेक राज्यात बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस

उद्धव ठाकरे हे अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी आणि अकोला जिल्ह्यातीलपदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे संवाद देखील साधणार आहेत.

राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा पठण

उद्धव ठाकरेंच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे.

शिंदे गटाच्या मंत्र्यांची बैठक

विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेनेच्या दोन्ही गटाला नोटीस बजावण्यात आल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. दोन्ही गटातील आमदारांना आपलं म्हणण मांडण्यासाठी सात दिवसांची नोटची बजावण्यात आल्यानंतर दोन्ही गटातील मंत्री अॅक्शन मोडवर आल्याचं म्हटलं जात आहे.

अखिलेश यादव घेणार शरद पवारांची भेट

राष्ट्रवादी पक्षात फुटीनंतर विविध राज्यातील नेत्यांनी शरद पवारांबरोबर फोनवर चर्चा केली आहे. मात्र समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश मुंबईत येऊन शरद पवारांची सिल्वर ओक वर भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार धुळे जिल्ह्यात

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुळे जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

अजित पवारांसोबत असलेल्या महिला राष्ट्रवादी काँग्रसेची बैठक

अजित पवारांसोबत असलेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसची बैठक होणार आहे. या पार्श्ववभूमीवर नवीन पदाधिकारी नियुक्त्या आणि पुढील रणनीती या संदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष आणि इतर राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार आहेत.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

आज भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार आहेत.

दिल्लीतल्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी

दिल्लीतल्या अधिकाऱ्यांची बदली आणि पोस्टींग संदर्भात दिल्ली सरकारने सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

देशात पावसाचं थैमान

दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात मध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर देशातील अनेक राज्यात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

from maharashtra https://ift.tt/SdsT8Rv
10th July Headline : उदधव ठकरचय वदरभ दऱयच दसर दवस शद गटतल आमदरच बठक; आज दवसभरत
July 09, 2023
0
Tags