8th June Headlines: आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रात विविध घडामोडी होणार आहेत. त्यातील काही महत्त्वांच्या घडामोडींवर एक नजर...

आषाढी वारी :

नाशिक मनमाड- आषाढी एकादशीच्या निमित्त पायी दिंड्याचे प्रस्थान. नाशिकच्या मनमाड येथील कैकाडी महाराज संस्थांनची मानाची दिंडी आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.

परभणी- शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचे आज परभणीत आगमन होणार आहे.

मुंबई

- मुंबईमध्ये तरुणीवर विनयभंग करून खून केल्याचा प्रकार घडल्यानंतर आता राज्यभरातून या सगळ्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ पोलीस महासंचालकांची भेट घेणार आहेत.

- आरबीआयकडून आज सकाळी पतधोरण जाहीर केले जाणार आहे.

- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद

- समीर वानखेडे यांनी सीबीआयनं दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी

पुणे

राज्यातील 26 तुरुंगात कैद्यांमध्ये सुधार व्हावा यासाठी भजन स्पर्धेचे आयोजन.

पिंपरी - भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना अटक करावी. या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे धरणे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर

- शिवसेना संभाजीनगर शाखेचा 38 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन; शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सहभागी होणार.

अमरावती

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. फडणवीस शहरातील बालाजी प्लॉट मध्ये कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

भंडारा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते बारावी आणि दहावी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

गोंदिया

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

from maharashtra https://ift.tt/LPvn5E3
8th June Headlines: आरबीआयकडून पतधोरण जाहीर होणार, समीर वानखेडेंच्या याचिकेवर सुनावणी; आज दिवसभरात
June 07, 2023
0
Tags