Ads Area

5th June Headlines: मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीत? मुंबईमध्ये भाजप-काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद; आज दिवसभरात....

5th June Headlines: आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत.  राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. आज मंत्रिमंडळ विस्तारावर अमित शाहांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मुंबई भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदा होणार आहेत. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. एक नजर दिवसभरातील घडामोडींवर...

पालखी सोहळा

नाशिक - संतश्रेष्ठ निवृत्ती नाथ महाराजांची पालखी नाशिक शहरात पोहचली आहे. पालखी आज नाशिकहून सिन्नरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

हिंगोली- गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्याच्या वेशीवर दाखल होणार आहे. साधारण साडेसातशे वारकरी एका महिन्यामध्ये शेगाव ते पंढरपूरला असा साडेपाचशे किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करणार आहेत.

दिल्ली

- राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. आज मंत्रिमंडळ विस्तारावर अमित शाहांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

मुंबई

- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वा लाखे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या महिला पैलवानांच्या समर्थनार्थ आज दुपारी 4 वाजता मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

- खासदार श्रीकांत शिंदे सकाळी मध्य रेल्वेच्या मुख्यालयात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लोकल ट्रेन संदर्भात चर्चा करणार आहेत.

- भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी सी.टी रवी यांची आज पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.

- सुप्रिया श्रीनाते काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या प्रमुख यांची पत्रकार परिषद

- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी.

अहमदनगर

- आज सकाळी प्रकाश आंबेडकर नगर शहरात येणार असून शेवगाव दंगल प्रकरणी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.

पुणे

- शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे इत्यादी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज आठ लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक होणार आहे.

- भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल दोन दिवसाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. बारामती आणि इंदापूरमध्ये जाहीर सभेला करणार संबोधित

- जेजुरी बाहेर विश्वस्तांची मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त पदी नियुक्ती केल्याप्रकरणी जेजुरी ग्रामस्थांनी पुनर्विचार याचिका धर्मादायुक्तांकडे दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे

ठाणे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समूह विकास योजना (क्ल्स्टर) प्रकल्पाचा शुभारंभ होणार.

नांदेड

- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आज बोंढार येथे येणार असल्याची शक्यता आहे. मयत अक्षय भालेरावच्या बोंढार निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे. आज डाव्या आघाडीतल्या संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर

- जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

नागपूर

- नागपूर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्ता सुजाता पॉल यांची आज नागपुरातील प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. मोदी सरकारचे नऊ वर्ष आणि ओडिसा मध्ये झालेले भयावह रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मोदी सरकार विरोधात ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

यवतमाळ

- ॲबओरिजीन्स लिगल गोंड गोवारी असोसिएशन अबाऊट राईट्स, महाराष्ट्र आदिवासी गोंड गोवारी संस्कृती आणि कल्याण मंडळ चंद्रपूर, आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती, यवतमाळ या तीनही संघटनाच्या संयुक्त विद्यमाने संविधानिक हक्कासाठी गोंड गोवारी जमात बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहे.

from maharashtra https://ift.tt/PFH3RkG

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area