Ads Area
23rd June In History: आजच दवस दन मठय वमन अपघतच सकषदर एकन सजय गधच जव घतल दसऱयत 329 भरतय ठर; आज दवसभरत
देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 23 जून या तारखेला नोंदवलेल्या इतर काही महत्त्वाच्या घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे,
1661: पोर्तुगालने हुंडा म्हणून मुंबई शहर ब्रिटनला दिला
आता जे शहर मुंबई (Mumbai) म्हणून दिसत आहे ते पहिला सात बेटांचा समूह होता. या शहरात पोर्तुगिजांनी आपली वखार सुरू केली. 23 जून 1661 रोजी ब्रिटनचा सम्राट चार्ल्स II ने पोर्तुगीज राजकन्येशी विवाह केला आणि आणि पोर्तुगालने हुंडा म्हणून ब्रिटनला मुंबई हे शहर दिलं.
1757: प्लासीच्या लढाईत सिराज-उद्दौलाचा ब्रिटिशांकडून पराभव
प्लासीची पहिली लढाई (Battle of Plassey 1857)  23 जून 1757 रोजी मुर्शिदाबादच्या दक्षिणेस 22 मैलांवर असलेल्या नादिया जिल्ह्यातील भागीरथी नदीच्या काठी 'प्लासी' नावाच्या ठिकाणी झाली. या युद्धात एका बाजूला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य होते तर दुसऱ्या बाजूला बंगालचा नवाब सिराज उद्दौलाचे सैन्य होते. कंपनीच्या सैन्याने रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली नवाब सिराज-उद्दौलाचा पराभव केला. या युद्धापूर्वी कलाईवेने नवाबाचे तीन सेनापती मीर जाफर, त्याचा दरबार आणि राज्याचे श्रीमंत सेठ जगतसेठ इत्यादींशी कट रचला होता. नवाबाच्या संपूर्ण सैन्याने युद्धात भागही घेतला नाही. युद्धानंतर लगेचच मीर जाफरचा मुलगा मीरान याने नवाबाचा वध केला होता. हे युद्ध भारतासाठी अत्यंत दुर्दैवी मानले जाते. भारताच्या गुलामगिरीची कहाणी या युद्धापासून सुरू होते.
1761 : बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू
बाळाजी बाजीराव (Balaji Baji Rao) ऊर्फ नानासाहेब पेशवे (Nanasaheb Peshwa) हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्यानंतर मराठा साम्राज्याचे (Maratha Empire) पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना 25 जून 1740 रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण 1760 च्या आसपास मराठा साम्राज्य हे भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी साम्राज्य बनले. परंतु 1761 च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्क्याने 23 जून 1761 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
1810: मुंबईच्या डंकन डॉकचे बांधकाम पूर्ण झाले.
1868: क्रिस्टोफर एल. शोल्स यांना टाइपरायटरचे पेटंट मिळाले.
1953: जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे काश्मीरमधील रुग्णालयात निधन झाले.
1960: जपान आणि अमेरिका यांच्यात सुरक्षा करार.
1980: संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे पूत्र संजय गांधी (Sanjay Gandhi Death) यांचे 23 जून 1980 रोजी एका विमान अपघातात निधन झाले. ते इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचे राजकीय वारस होते. इंदिरा गांधी यांच्या अनेक निर्णयामध्ये आणि काँग्रेसच्या सर्व महत्त्वाच्या निर्णयामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. भारतातील आणीबाणीच्या काळात त्यांची भूमिका खूप वादग्रस्त ठरली होती.
1985: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात
1994: संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दक्षिण आफ्रिकेच्या सदस्यत्वाला मान्यता दिली.
1994: उत्तर कोरियाने आण्विक कार्यक्रमावर बंदी घालण्याची घोषणा केली.
1996: शेख हसीना वाजिद यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
2008: जेके टायर इंडिया लिमिटेड, देशातील आघाडीची टायर निर्माता कंपनीने मेक्सिकोची टायर कंपनी टोर्नल आणि तिच्या उपकंपन्या 270 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतल्या.
2016: ब्रिटनच्या लोकांनी युरोपियन युनियन (Brexit) सोडण्यासाठी मतदान केले. 51.9 टक्के लोकांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले, तर 48.1 टक्के लोकांनी विरोध केला. त्यानंतर ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
2021: इथियोपियातील टिग्रे येथे झालेल्या हवाई हल्ल्यात 50 हून अधिक लोक मारले गेले.
from maharashtra https://ift.tt/J4IrzGs
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Below Post Ad
Ads Area