Ads Area
दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून; बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर
Maharashtra Board SSC and HSC Re-examination: दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरु होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान तर बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या जुलै - ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 18 जुलैपासून परीक्षा सुरू होणार आहेत. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली आहे. लेखी पुरवणी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येईल. तर दहावीची परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान होईल. बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्टदरम्यान होणार आहे. तसंच परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक हे मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे.
या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.
ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी सूचना...
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवाररी-मार्च 2023 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.
श्रेणीनुसार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रु-मार्च 2023 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी जुलै-ऑगस्ट 2023 व फेब्रुवारी-मार्च 2024 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी.
सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.
आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
<a href="https://ift.tt/zlRwtqV Exam: इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचे आवेदन पत्र भरण्यास सुरवात; 'या' ठिकाणी करावा लागणार अर्ज
from maharashtra https://ift.tt/qBdxQC2
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Below Post Ad
Ads Area