मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं दिसून येतंय. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी पक्षाचे नेतृत्व करावे असा ठराव आज होणाऱ्या बैठकीत येण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

शरद पवार हे लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचे अध्यक्ष राहतील याला सर्व निमंत्रित सदस्यांची तत्वत: अनौपचारिक मान्यता असेल अशी माहिती आहे. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली दुसरं एखादं पद तयार केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2 मे रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शरद पवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयानंतर राज्यभरातील नेते आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली तर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहून शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन शरद पवारांनी आपण एक-दोन दिवसात यावर विचार करु असं सांगितलं. दरम्यान राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष नेमण्यासाठी शरद पवारांनी प्रमुख नेत्यांची एक समिती नेमली असून त्या समितीची आज बैठक आहे. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी अध्यक्षपदी कायम रहावं अशा ठराव होण्याची शक्यता आहे.

अध्यक्ष निवडीच्या समितीत कोण आहे?

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.

काय म्हणाले शरद पवार?

कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांच्या नाराजीनंतर, त्यांच्या आंदोलनानंतर शरद पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याबाबत येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया खुद्द शरद पवार यांनी दिली आहे. दोन दिवसानंतर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे. पक्षातल्या लोकांच्या तीव्र भावना मला दिसत असून मी हा निर्णय पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला असल्याचं पवार म्हणाले. नवं नेतृत्व तयार व्हावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मला एक खात्री होती की मी तुमच्याशी चर्चा केली असती तर तुम्ही सकारात्मकता दर्शविली असती, तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती. पण मी ते केलं नाही अशी प्रांजळ कबुली शरद पवारांनी आपल्या प्रेमापोटी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संवादा दरम्यान दिली.

याही बातम्या वाचा:

मुंबई केंद्रशासित करण्याचं कुणाच्या मनात नाही, या विषयाला कायमचा पूर्णविराम द्या, आत्मचरित्रात पवारांची भूमिका

<a href="https://ift.tt/oaYr5Bz Pawar Resigns : शरद पवारच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधींनीही दिला होता राजीनामा... वाचा काय घडलं होतं?

from maharashtra https://ift.tt/kxorhfK
Sharad Pawar: लोकसभेपर्यंत शरद पवारांनीच राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं; पक्षाच्या आजच्या बैठकीत ठराव होण्याची शक्यता
May 04, 2023
0
Tags