Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/IUzFBsu May In History: सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराजांचे निधन, मुंबई हल्ल्यातील अजमल कसाबला फाशी; आज इतिहासात

6th May In History: आजचा दिवस हा देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांचे आजच्याच दिवशी निधन झालं होतं. तर 26 नोव्हेंबर 2011 सालच्या मुंबई हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबलाही आजच्याच दिवशीस फाशी देण्यात आली होती. जाणून घेऊया आजच्या दिवशीच्या इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी.

1856 : आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांचा जन्म

सिग्मंड फ्रॉइड (Sigmund Freud) हे प्रख्यात ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, वैद्य आणि मनोविश्लेषणाचे प्रणेते होते. सिग्मंड फ्रॉइड यांनी विश्लेषणात्मक मानसशास्त्रात पायाभूत संशोधन केले. विसाव्या शतकातील एक थोर विचारवंत म्हणून फ्रॉइड यांचे स्थान आहे. त्यांनी मानवी मनाबाबत मांडलेल्या संकल्पनांमुळे मानवी स्वभावाबाबतच्या पारंपारिक कल्पनांमध्ये फार मोठी उलथापालथ झाली.

1857 : ब्रिटिशांनी उठाव करणारी 34 वी रेजिमेंट बरखास्त केली

ब्रिटिशांनी आणलेल्या नव्या एन्फिल्ड बंदुकीच्या काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावली असल्याचा आरोप होता. त्याविरोधात मंगल पांडे यांने सैन्यात उठाव केला. त्यानंतर बंगाल नेटिव्ह इन्फन्ट्रीची 34 वी रेजिमेंट बरखास्त करण्यात आली. नंतरच्या काळात बंगालमध्ये 1857 च्या उठावाला सुरुवात झाली आणि त्याचा प्रसार संपूर्ण देशभर झाला.

<a href="https://ift.tt/jFu7rkM Today 6 May 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; मेष ते मीन राशीचे जाणून घ्या आजचे राशीभविष्य

<a href="https://ift.tt/Y4eqgyd Today 6 May 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. कन्या राशीचे लोक जे घरापासून दूर नोकरी करत आहेत त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. कसा असेल शनिवारचा दिवस मेष ते मीन, काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर

from maharashtra https://ift.tt/nIovr78
Maharashtra News Updates 6th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
May 05, 2023
0
Tags