Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/ygq4ZIw Shivakumar: उपमुख्यमंत्री नको... मुख्यमंत्रीपदच हवं; नाराज डीके शिवकुमार यांची भूमिका, काँग्रेससमोरील पेच वाढला

Karnataka Government Formation: कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून अजूनही अंतिम निर्णय झाला नाही. सिद्धारमय्या यांचे नाव अंतिम झाल्याच्या बातम्या येत असताना आता मुख्यमंत्रीपदाचे दुसरे दावेदार असलेले डीके शिवकुमार (DK Shivakumar) नाराज असल्याची चर्चा आहे. डीके शिवकुमार हे अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी अडून असल्याची बातमी आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड अद्याप कोणत्याही निर्णयावर आलं नाही.

सिद्धारय्या यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम झालं असून डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची सहा खाती देण्याची ऑफर असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाव्यतिरिक्त कोणतंही पद नको असल्याचं कळवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडची डोकेदुखी वाढली असून मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

डीके शिवकुमार हे कनकापुरा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. काँग्रेसचा एक डॅशिंग नेता अशीच त्यांची ओळख असून भाजपला जशास तसं उत्तर देण्यात तरबेज आहेत.

<a href="https://ift.tt/bjsLROz ST Bus News: एसटीचा चालताबोलता इतिहास हरपला; ST चे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन

Maharashtra ST Bus News:  राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे (MSRTC) पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे आज (17 मे 2023) वृद्धपकाळाने निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. आज रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे एसटी प्रेमींमध्ये (ST Bus) हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या एक जून रोजी पहिल्या एसटी प्रवासाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीच केवटे यांचे निधन झाल्याने एसटीच्या इतिहासाचा (ST Bus) साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे. उद्या, गुरुवारी अहमदनगर येथील अमरधाम येथे सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

राज्यातील पहिली एसटी बस सेवा 1948 मध्ये अहमदनगर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली. त्या काळी नगर शहर फार लहान होते. सरकारची प्रवासी बससेवा नसल्याने बसस्थानक असे नव्हतेच. खासगी बस माळीवाडा परिसरातून बाहेरगावी जात असत. याच परिसरातून पहिली बस पुण्याकडे धावली. त्यावेळी देखील खासगी अवैध प्रवासी वाहतूक होत असे. त्यांच्याकडून ही एसटीला अडथळे आणण्याचे प्रयत्न होत असे, जाणकार सांगतात. अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे चालक आणि वाहक दोघेही अहमदनगरचे होते. एसटीचे वाहक म्हणून लक्ष्मण केवटे आणि चालक म्हणून किसन राऊत यांच्याकडे जबाबदारी होती. लक्ष्मण केवटे हे एसटी महामंडळातून 30 एप्रिल 1984 रोजी सेवानिवृत्त झाले.

from maharashtra https://ift.tt/RvQZEVn
Maharashtra News Updates 18th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
May 17, 2023
0
Tags