Ads Area

Maharashtra News Updates 10th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/PfLXsqj May In History: पानिपतचे पहिले युद्ध जिंकून बाबर आग्र्यामध्ये आला, 1857 च्या उठावाला मेरठमधून सुरुवात; आज इतिहासात

On This Day In History: आजचा दिवस भारताच्या आणि जगाच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 10 मे 1526 रोजी पानिपतची लढाई जिंकल्यानंतर बाबरने देशाची तत्कालीन राजधानी आग्रा येथे पाऊल ठेवले आणि मुघल राजवट स्थापन करून आपल्या देशाचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला. जगात दररोज काही ना काही विक्रम केले जातात आणि मोडले जातात, परंतु प्रथम यश मिळवणाऱ्याचे नाव नेहमीच लक्षात राहते. हरियाणाच्या संतोष यादवने 10 मे 1993 रोजी सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले आणि असे करणारी ती जगातील पहिली महिला गिर्यारोहक ठरली.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 10 मे या तारखेला नोंदवलेल्या इतर काही महत्त्वाच्या घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

1526 - पानिपतचे युद्ध जिंकून बाबर आग्र्याला आला

पानिपतच्या पहिल्या लढाईत (First Battle of Panipat) बाबरने (Babur) इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि 10 मे 1526 रोजी त्यावेळची राजधानी आग्र्यामध्ये प्रवेश केला. पानिपत हे भारतीय इतिहासातील तीन मोठ्या युद्धांचे साक्षीदार आहे. पानिपतची पहिली लढाई 21 एप्रिल 1526 रोजी दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यात झाली. बाबरच्या सैन्याने इब्राहिम लोधीच्या एक लाखाहून अधिक सैनिकांचा पराभव केला. अशा प्रकारे पानिपतच्या पहिल्या लढाईने बहलूल लोदीने भारतात स्थापन केलेल्या लोदी घराण्याचा अंत झाला आणि दिल्लीमध्ये मुघल राजवटीची (Mughal Empire) स्थापना झाली. पुढे मुघल राजवटीने देशावर 250 वर्षे राज्य केलं.

<a href="https://ift.tt/o7tj4bN Local Train:  लोकलवर दगडफेक करण्याआधी दहावेळा विचार करा! हायकोर्टाने आरोपीला सुनावली कठोर शिक्षा

Mumbai Local Train:  मुंबईतील लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक आणि लोखंडी सळई फेकून हल्ला करणाऱ्या एका 40 वर्षीय आरोपीला मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवत एकाच प्रकारच्या चार गुन्ह्यामध्ये प्रत्येकी 10 वर्षांच्या सश्रम कारावसाची शिक्षा सुनावली आहे. आपल्या या कृतीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येईल, याची आरोपीला पूर्ण कल्पना होती. मात्र तरीही त्यानं लोकलवर दगडफेक आणि लोखंडी सळई फेकून मारण्यासारखं कृत्य केलंय. अशा समाजकंटकांना शिक्षा ठोठावून समाजात योग्य तो संदेश पोहोचवणं गरजेचं आहे, असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभय जोगळेकर यांनी आपल्या निकालात नोंदवत हत्येच्या आरोपाखाली आरोपीला ही शिक्षा ठोठावली आहे.

काय आहे प्रकरण?

कुर्ला आणि विद्यविहार स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकलवर 40 वर्षीय राकेश रॉडनं 16 जुलै 2019 रोजी एकच दिवशी तीनदा दगडफेक केली होती. त्यामध्ये कुर्ला ते विद्याविहार दरम्यान दुपारी प्रवास करणारे रतनदीप चंदनशिवे प्रथम लक्ष्य झाले. ज्यात त्यांच्या डाव्या कोपराला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर टिटवाळास्थित अजय कहार (23) हा तरूण गोवंडीहून कुर्लामार्गे घरी परतत असताना राकेशनं केलेल्या दगडफेकीमुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. तर 32 वर्षीय तौसिफ खान हा सायंकाळी पनवेलच्या दिशेनं प्रवास करत असताना राकेशनं अचानक फेकलेल्या सळईचा मार थेट त्याच्या पोटात बसला होता. या घटनेत जखमी झालेल्या दोघांच्या डोक्याला टाके घालावे लागले होते. याशिवाय एका विद्यार्थ्यानं या हल्ल्यात स्मरणशक्ती गमावल्याचीही माहिती आहे. या हल्ल्यांनतर राकेश रॉडला लगेचच अटक करण्यात आली, तेव्हापासून तो कारागृहातच आहे.

from maharashtra https://ift.tt/JfYyimZ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area