Ads Area

Atul Save: निधीच्या तुलनेत आश्रमशाळांमध्ये सोयीसुविधा मिळतात का?; मंत्री अतुल सावेंचा महत्वाचा निर्णय

<a href="https://ift.tt/qRTYEye News : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून निवासी वसतिशाळांना मोठ्या प्रमाणावर निधी वितरीत करण्यात येते. मात्र अनेकदा या निधीचा गैरवापर करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळाले. त्यामुळे निधीच्या तुलनेत आश्रमशाळांमध्ये सोयीसुविधा मिळतात का? यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठवड्याला या शाळांची तपासणी करण्याचे आदेश इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे <a href="https://ift.tt/sZVPyUQ Save) यांनी दिले आहेत. परभणी (Parbhani) जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या आहेत.

परभणी जिल्ह्यातील निवासी वसतीगृहांना राज्य शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या निधीच्या तुलनेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, जेवण आणि इतर सोयीसुविधा दिल्या जात असल्याची खात्री करावी. तसेच ज्या निवासी वसतिशाळांमध्ये संस्थाचालकांकडून या सोयीसुविधा पुरविण्यात त्रुटी अथवा कमतरता आढळून येत असल्यास त्याचा अहवाल विभागाकडे सादर करण्याचे आदेश मंत्री सावे यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील 39 आश्रमशाळांना दर आठ दिवसाला ठरवून भेटी द्याव्यात, विद्यार्थ्यांच्या निवासव्यवस्था, विद्यार्थीसंख्या, पटपडताळणी यासह विविध बाबींचा तपासणीदरम्यान आढावा घेण्याचे आदेश अतुल सावे यांनी दिले आहे.

नविन वसतिगृह सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

विजाभज प्रवर्गासाठी असलेल्या आश्रमशाळा, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विजाभज विद्यार्थ्यांसाठी शिष्यजवृत्ती, नविन वसतिगृह सुरु करणे, धनगर समाजातील विद्यार्थ्यांवसाठी नामांकीत शाळा आदी योजनांचा सविस्तर आढावा घेऊन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी. त्यामुळे योजनांची सर्वसामान्यांना माहिती होऊन त्यांना लाभ घेता येईल, असेही सावे म्हणाले. तसेच जिल्ह्यात विजा, भज, इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नविन वसतिगृह सुरू करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडील जागा उपलब्धभ करून घेण्यासाठी प्रस्तासव सादर करण्याचे निर्देश बैठकीत दिले.

बैठकीत अनेक निर्णय...

यावेळी वसंतराव नाईक विकास महामंडळ कर्जयोजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी पाठपुरावा करावा. धनगर समाज घरकुल योजनेत प्रस्तावांची छाननी करण्याची कार्यवाही सुरु आहे. धनगर समाजाच्या मुला-मुलींना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशाची विदयार्थी क्षमता साडेपाच हजारवरुन 11 हजार करण्याबाबतचा सद्यस्थितीतील आढावा, तसेच विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण देणे योजनेतंर्गत सन 2022-23 चा माहितीचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच यशवंतराव मुक्त वसाहत घरकुल योजना, वसंतराव नाईक तांडा वस्तीसुधार योजनेतील तालुकानिहाय आढावा, सैनिकी शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता योजनेचा आढावा, मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ, मर्यादित राबविण्यात येणाऱ्या योजनांचे उद्दिष्ट आणि साध्य याचा आढावा तसेच नविन वसतिगृह सुरु करण्याबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांनी आढावा घेतला.

इतर महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/5KyGmxS : सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू, एक जण अत्यवस्थ; परभणी जिल्ह्यातील घटना

from maharashtra https://ift.tt/VOxk2yK

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area