Ads Area

8th May In History: टॉनिक म्हणून कोका-कोलाचा शोध, जर्मनीच्या शरणागतीनंतर दुसऱ्या महायुद्धाचा शेवट; आज इतिहासात

8th May In History: वर्षभराप्रमाणे 8 मे चा दिवसही इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांसाठी स्मरणात आहे. जगाच्या इतिहासात महत्त्वाच्या ठरलेल्या दुसऱ्या महायुद्धाचा शेवट आजच्याच दिवशी झाला होता. जर्मन हुकूमशहा हिटलरने आत्महत्या केल्याच्या एका आठवड्यानंतर, जर्मन जनरल आल्फ्रेड योडलने बिनशर्त आत्मसमर्पणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीची औपचारिक घोषणा होईपर्यंत भौगोलिक परिस्थितीमुळे रशियामध्ये दुसरा दिवस होता, त्यामुळे 9 मे रोजी पहिले महायुद्ध संपल्याचा उत्सव साजरा करण्यात आला. तथापि जपानने सप्टेंबरमध्ये आत्मसमर्पण केले आणि त्यानंतरच दुसरे महायुद्ध खऱ्या अर्थाने संपुष्टात आले.

1864 : आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसची स्थापना

स्विस उद्योगपती जीन हेन्री ड्युनंट यांच्या पुढाकाराने 8 मे 1864 रोजी इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटीची (International Red Cross Society) स्थापना करण्यात आली. युद्धजन्य किंवा नैसर्गिक आपत्ती असेल, किंवा इतर काही आणीबाणीची परिस्थिती असेल, त्यावेळी लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे आणि त्यांना मदत करणे हा उद्देश संस्था स्थापन करण्यामागे होता. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान या संस्थेने मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि अनेक लोकांचा जीव वाचवला. या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन 1917, 1944 आणि 1963 असे तीनदा नोबेल पुरस्काराने (Nobel Prize) गौरवण्यात आलं आहे. या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा

इंडियन रेड क्रॉस सोसायटी (Indian Red Cross Society) ही भारतातील स्वयंसेवी मानवतावादी संस्था आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस आणि रेड क्रेसेंट चळवळीचा एक भाग आहे आणि आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीची मूलभूत तत्त्वे अमलात आणते. आणीबाणीच्या काळात लोकांना मदत करणे हे सोसायटीचे ध्येय आहे. याचे संपूर्ण भारतात याच्या 700 पेक्षा जास्त शाखांचे जाळे आहे.

1886 : कोका कोलाची सुरुवात

जगाच्या कानाकोपऱ्यात प्यायले जाणारे शीतपेय म्हणजे कोका-कोला (Coca-Cola). या कोका कोलाचा शोध आजच्याच दिवशी म्हणजे 8 मे 1886 रोजी लागला. सुरुवातीला हे एक टॉनिक असल्याचं सांगितलं जायचं, म्हणजे याचा वापर हा टॉनिक म्हणूनच केला जायचा. अमेरिकन फार्मासिस्ट जॉन स्टिथ पेम्बर्टन याने याचा शोध लावला. 1988 साली याचे पेटंट कॅन्डलर या व्यावसायिकाला विकण्यात आले. त्यानंतर मार्केटिंगच्या जीवावर कोका कोलाने सॉफ्ट ड्रिंकच्या बाजारात वर्चस्व निर्माण केलं. कोका कोला हे नाव त्याच्या दोन मूलभूत घटकांचा संदर्भ देते. एक म्हणजे कोका पाने आणि कोला फळ. कोला फळ हे कॅफिनचा स्रोत आहे.

1914 : मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात

8 मे 1914 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा संमत करून घेतला. या कायद्यानुसार, मे महिन्याचा दुसरा रविवार 'मदर्स डे' (Mothers Day) म्हणून साजरा करण्यात येतो. तेव्हापासून बहुतांश देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जाऊ लागला. भारतामध्येही मदर्स डे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी आईला कामात मदत करून, तिला वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन खुश केले जाते.

1929 : भारतीय शास्त्रीय गायिका गिरीजा देवी यांचा जन्मदिन

बनारस घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका गिरीजा देवी (Girija Devi) यांचा जन्म 8 मे 1929 रोजी झाला. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच हिंदुस्थानी संगीत क्षेत्रांत दिला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. ठुमरी या शास्त्रीय संगीत प्रकारासाठी त्या विशेष ओळखल्या जातात.

1933 : अस्पृश्यता निवारणासाठी गांधीजींचे उपोषण सुरू

दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर 18 ऑगस्ट 1932 ब्रिटिशांनी जातीय निवाडा जाहीर जाहीर केला. त्यानुसार दलितांना विभक्त मतदारसंघ देण्याची घोषणा केली. त्याच्या विरोधात गांधीजींनी (Mahatma Gandi) आंदोलन उपोषण सुरू केलं. त्याचे फलित म्हणून 24 सप्टेंबर 1932 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमध्ये येरवडा करार (Poona Pact) झाला. त्यानुसार दलितांना विभक्त नव्हे तर स्वातंत्र्य मतदारसंघ देण्यात आले.

या दरम्यान भारतातील जातीयतेवर प्रकाश पडला आणि अस्पृश्यता निवारणासाठी गांधीजींनी पुढाकार घेण्याचं जाहीर केलं. त्याचाच एक भाग म्हणून 8 मे 1933 पासून 21 दिवसांचे उपोषण सुरू केले

1945 : जर्मनीची शरणागती आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट

पराभव समोर दिसू लागताच जर्मनीच्या हुकूमशहा हिटलरने आत्महत्या केली. त्यानंतर जर्मनीसमोर शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता. 8 मे 1945 रोजी जर्मनीचा जनरल आल्फ्रेड योडलने बिनशर्त आत्मसमर्पणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. या दिवसाला युरोपच्या इतिहासात मोठं महत्त्व आहे. जर्मनीच्या शरणागतीमुळे हा दिवस युरोपमध्ये 8 मे हा दिवस युरोपमध्ये विजय दिवस (Victory in Europe Day or V-E Day) म्हणून साजरा केला जातो. पण 2 सप्टेंबर 1945 रोजी जपानने अमेरिकन सैन्यासमोर शरणागती पत्करली आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.

1982 : आत्माराम रावजी देशपांडे यांचे निधन

आत्माराम रावजी देशपांडे हे कवी अनिल या टोपन नावाने लेखन करणारे एक मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी होते. मुक्तछंदातील काव्यप्रकाराचे प्रवर्तक असणारे कवी अनिल यांनी दहा चरणांची कविता सर्वप्रथम सुरू केली. सन 1982 साली भारतातील महाराष्ट्र राज्यातील विदर्भीय मराठी भाषिक कवी आणि साहित्यकार आत्माराम रावजी देशपांडे यांचे निधन झाले.

2004 : मुथय्या मुरलीधरनचा सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम

श्रीलंकेचा गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) 521 विकेट्ससह सर्वाधिक कसोटी बळींचा विक्रम केला. त्या आधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या कोर्टनी वॉल्शच्या नावावर होता.

from maharashtra https://ift.tt/jqfIR3r

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area