4th May Headlines: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात. काही घडामोडी या सामाजिक राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असतात. आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्ट, मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

मुंबई

- राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे पदाधिकारी आज एकत्रितरित्या शरद पवार यांना आपल्या पदाचे राजीनामे स्वतः भेटून देणार आहेत. पक्ष संघटना बळकट करायची असेल तर शरद पवार हेच अध्यक्ष आहेत अशी या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे.

- राजकीय सामाजिक गुन्हे किंवा खटले काढून घेण्यासाठी राज्यपातळीवर आंदोलनाबाबत सुजात आंबेडकर यांची पत्रकार परिषद होणार आहे.

- हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी ईडीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

- मालेगाव ब्लास्ट 2008 प्रकरणी युएपीए कायद्यातील गंभीर कलम लावण्याकरता दिलेली चुकीची मंजूरी रद्द करण्याच्या मागणीसाठी आरोप समीर कुलकर्णी यांनी हायकोर्टात दाखल केलेल्य याचिकेवर आज सुनावणी.

बुलढाणा

- शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे आनंद सागरमधील आध्यात्मिक केंद्र आजपासून भक्तांसाठी खुले होणार. संत गजानन भक्तांना अनेक वर्षांपासून आनंद सागर अध्यात्मिक केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा होती.

पुणे

- दिल्लीत सुरु असलेल्या कुस्तीपटुंच्या आंदोलनाला पुण्यातील कुस्तीपटू प्रतिकात्मक कुस्त्या खेळून पाठिंबा देणार आहेत. एस पी कॉलेज समोर या प्रतिकात्मक कुस्त्यांचे कॉंग्रेस पक्षाकडून आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी - खासदार अमोल कोल्हे यांची पत्रकार परिषद होणार आहे.

सोलापूर

- मंगळवेढा येथे मंगळवेढा फेस्टिवल होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.

नाशिक

- कृषिमंत्री अब्दुल सत्तार नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता खरीप हंगाम आढावा बैठक घेणार आहेत.

राष्ट्रीय

बेळगाव - शिवसेना खासदार संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बेळगाव दौऱ्यावर आहेत.

दिल्ली - भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला पहिलवानांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.

उत्तर प्रदेश - आज सहारनपूर, मुरादाबाद, आग्रा, झाशी, प्रयागराज, लखनौ, देवीपाटन, गोरखपूर, वारणसी इथे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

दिल्ली/जयपूर - आंतरराष्ट्रीय कुस्ती पहिलवानांच्या समर्थनात आज जयपूर मध्ये प्रादेशिक खेळाडू एकत्र येणार आहेत.

दिल्ली - दोषींना राजकीय पक्ष किंवा पदाधिकारी बनण्यापासून अजिवन बंदीची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 2017 साली ही याचिका करण्यात आली होती.

from maharashtra https://ift.tt/pW7ekyM
4th May Headlines: देवेंद्र फडणवीस, संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर, बृजभूषण सिंह यांच्या विरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी; आज दिवसभरात...
May 03, 2023
0
Tags