2nd May Headlines: आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्ट, मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती'च्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील सत्ता स्थापनाचे रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आंबेडकरी संघटनांचा धिक्कार मोर्चा आहे.

मुंबई

- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन होणार आहे. महाराष्ट्रात 2019 पासून अनेक राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. या सर्व उलथापालथी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दुरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. या सर्व घटनांचे साक्षीदार स्वत: शरद पवार असल्याने पुस्तकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

- हसन मुश्रीफ यांनी ईडीनं दाखल केलेला ईसीआयआर रद्द करण्याासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. याप्रकरणी मुश्रीफांचा अटकपूर्व जामीनही हायकोर्टात प्रलंबित असून तूर्तास त्यांना जूनपर्यंत अटकेपासून दिलासा दिलेला आहे

- नवाब मलिक यांनी जामीनासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आजपासून सुनावणी. सर्वोच्च न्यायालयानं मलिकांना ताताडीचा दिलासा नाकारत हायकोर्टातच रितसर दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.

- जेईई पर्सेंटाईलच्या मुद्द्यावर अनुभा सहाय यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. नुकताच या परिक्षेचा निकाल लागला असून विद्यार्थी आता जेईई मेनची तयारी करत असल्यानं आजची सुनावणी महत्त्वाची आहे.

- मुंबईतील उंच इमारतींमधील अग्निसुरक्षेसंदर्भात हायकोर्टात आभा सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे.

अमरावती

- आज राणा दाम्पत्याविरोधात आंबेडकरी संघटनांनी धिक्कार मोर्चाचे आयोजन केले आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सत्तेचा दुरुपयोग करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून आंबेडकरी आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे

गडचिरोली

- उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गडचिरोली जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील विकासाच्या विविध योजनांवर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय होणे अपेक्षित

सिंधुदुर्ग

- मंत्री दीपक केसरकर आज सावंतवाडीमध्ये सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेतील

अहमदनगर

- कर्जत नगरपंचायत सफाई कर्मचारी आजपासून काम बंद आंदोलन करणार आहेत. चार महिने झाले तरी पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

दिल्ली

- भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणाऱ्या दोन कुस्तीपटूंचे जबाब आज नोंदवले जाण्याची शक्यता आहे
- बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.
- फाशीच्या शिक्षेला पर्याय शोधणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

अहमदाबाद

- मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

कर्नाटक

- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन सभा आणि एक रोड शो करणार आहेत चित्रदुर्ग, विजयनगर आणि रायचूर येथे सभा होणार आहेत.

- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज कर्नाटकातील शिवगोमा, दावणगेर सभा होणार आहे. त्यानंतर चिकमगलूर येथे रोड शो होईल.

- कर्नाटक निवडणूक प्रचारासाठी काँग्रेस आज जाहीरनामा जाहीर करणार आहे. यावेळी कॉग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सिद्धारमैया उपस्थित राहतील

from maharashtra https://ift.tt/f2rg6Bi
2nd May Headlines: शरद पवारांच्या 'लोक माझे सांगती'च्या आवृत्तीचे प्रकाशन, राणा दाम्पत्याविरोधात मोर्चा; आज दिवसभरात
May 01, 2023
0
Tags