29th May In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आजच्या दिवशी विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म झाला होता, तर 2022 त्या गर्भपात कायद्यानुसार सर्व महिलांना 24व्या आठवड्यापर्यंत गर्भपाताला परवानगी देण्यात आली होती. 29 मे हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून देखील साजरा होतो. जाणून घ्या आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

जागतिक हृदय दिन

दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि हृदयविकारांच्या प्रतिबंध, उपचार आणि व्यवस्थापनासाठी उपाययोजना करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो.

1905 : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म.

हिराबाई बडोदेकर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका होत्या. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मिरज येथे झाला. त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. मराठी नाट्यपरिषदेने बालगंधर्व सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान केला (1966). त्यांना भारत सरकारने पद्मभूषण किताबाने गौरवले (१९७०). त्या विष्णुदास भावे सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या (1974). कोलकात्याच्या आय. टी. सी. संगीत रिसर्च अकादमीने त्यांचा सन्मान केला.

1932: विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म.

उत्तम अभिनय, उत्तम अवगत असलेली संगीत कला आणि विनोदाचा अचूक टायमिंग यामुळे अभिनेते मेहमूद यांनी दर्शकांना नेहमीच निखळ मनोरंजनचा आनंद दिला. अभिनेते, गायक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून नावारूपाला आलेले मेहमूद बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडीयन म्हणून आजही ओळखले जातात. मेहमूद यांचा जन्म मुंबईमध्ये १९३२ साली झाला. मेहमूद यांना सात भांवांडे असून, त्यांच्या आई मुमताज अली १९४०-५० च्या दशकामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका म्हणून ओळखल्या जात असत. १९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘परवरिश’ या चित्रपटामध्ये मेहमूद यांनी साकारलेल्या भूमिकेनंतर मेहमूद यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी लाभली. त्यानंतर आलेल्या प्यासा, सीआयडी, ससुराल, गृहस्थी, लव्ह इन टोकियो, पडोसन, भूत बंगला, बॉम्बे टू गोआ या चित्रपटांना अपार लोकप्रियता लाभली. आजच्या काळामध्येही हे चित्रपट ‘एव्हरग्रीन’ म्हणून ओळखले जातात.

1972: हिंदी चित्रपट अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे निधन.

पृथ्वीराज कपूर हे हिंदी सिनेमा आणि भारतीय रंगमंच यांचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. पृथ्वीराज यांनी मूकपटात आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. भारतीय जन नाट्य संघ (Indian People's Theatre Association-IPTA-) याच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. पृथ्वीराज यांनी 1944 मध्ये मुंबईत पृथ्वी थिएटरची स्थापना केली. ह्या नाटक कंपनीची नाटके संपूर्ण देशभरात होत होती. त्यांनी भारतातील पहिला श्राव्य चित्रपट 'आलम आरा' मध्ये एक प्रमुख भूमिका बजावली. पृथ्वीराज कपूर यांना 1969 साली कला क्षेत्रात पद्मभूषण देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते. 1972 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला.

1987: स्वातंत्र्य भारताचे पाचवे पंतप्रधान आणि भारतीय शेतकरी नेता चौधरी चरण सिंह यांचे निधन.

चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचा जन्म 1902 मध्ये उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्हयातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. ते सर्वप्रथम 1937 मध्ये छपरोली येथून उत्तरप्रदेश विधानसभेसाठी निवडले गेले. त्यांनंतर त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काम केलं. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 1979 साली ते देशाची अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान बनले. त्याच वर्षी त्यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना केली. 28 जुलै 1979 रोजी चौधरी चरण सिंह समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने देशाचे पंतप्रधान बनले. चौधरी चरण सिंह यांना वाचणाची आणि लिखाणाची आवड होती. त्यांनी जमीनदारी निर्मूलन, भारतातील गरीबी व त्यावरील उपाय, शेतकऱ्यांची मालकी की शेतकऱ्यांसाठी जमीन, प्रिवेन्शन ऑफ डिविजन ऑफ होल्डिंग्स बिलो ए सर्टन मिनिमम, को-ऑपरेटीव फार्मिंग एक्स-रेड या पुस्तकांचे लिखाण केलं. अल्पश: आजाराने त्यांचे 29 मे 1987 रोजी निधन झाले.

2022: गर्भपात कायदा, भारताच्या सुप्रीम कोर्टाने गर्भधारणेच्या 24व्या आठवड्यापर्यंत सर्व महिलांसाठी गर्भपात शस्त्रक्रिया कायदेशीर केली.

सुप्रीम कोर्टाने 2022च्या गर्भपात कायद्यानुसार, सर्व महिलांना 24 आठवड्यापर्यंत सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा अधिकार आहे असं म्हटलं आहे. 24 आठवड्यापर्यंत अविवाहित महिला गर्भपात करू शकतात असंही कोर्टाने म्हटलं आहे.अविवाहित महिलांच्या गर्भपाताशी निगडीत प्रकरणावर सुनावणी करताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं आहे.

इतर महत्त्वाच्या घटना:

1906: पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार, लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक कन्हैयालाल प्रभाकर मिश्रा यांचा जन्मदिन.

1916: जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले.

1917: मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली. (IES School)

1919: विश्वविख्यात जर्मन भौतिकशास्त्रज्ञ सर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सामान्य सापेक्ष सिद्धांताची चाचणी केली.

1941: दुसरे महायुद्ध – किएव्हमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.

1963: बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू.

2008: भारतीय जनता पक्षाचे नेता वी. एस. येदुरप्पा यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

from maharashtra https://ift.tt/vVAWcOG
29th May In History: जागतिक हृदय दिन, विनोदी अभिनेते मेहमूद यांचा जन्म, चौधरी चरण सिंह यांचे निधन; आज इतिहासात
May 28, 2023
0
Tags