Ads Area

25th May In History: शिवरायांच्या डरकाळीने औरंगजेबाचा दरबार दणाणला, मग दगाबाजीने राजांना आग्र्यात नजरकैदेत टाकलं; आज इतिहासात

25th May In History: मराठ्यांच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच दिवशी इतिहासात स्वराज्यावर सर्वात मोठं संकट आलं होतं. आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेलेल्या शिवाजी महाराजांनी दगाबाजीने अटक करण्यात आली. तसेच आजच्या दिवशी क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा जन्म झाला होता. यासह इतिहासातील इतर महत्त्वाच्या जाणून घेऊया,

1666 : शिवाजी महाराजांना नजरकैदेत टाकलं

आजचा दिवस मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारा आहे. कारण आजच्याच दिवशी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) आग्र्यामध्ये (Agra Fort) नजरकैदेत टाकण्यात आलं. औरंगजेबने (Aurangzeb) शिवरायांना दगाफटका करुन नजरकैदेत टाकलं.

छत्रपती शिवाजी महाराजांना आणि स्वराज्याला नियंत्रित ठेवण्यासाठी औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंह यांना दक्षिणेला पाठवलं. त्यावेळी मिर्झाराजेंनी स्वराज्याचं मोठं नुकसान केलं, त्यामुळे त्यांच्याशी तह करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. महाराजांनी आपल्याजवळीत 24 किल्ले हे मुघलांना दिले आणि त्यांच्याशी केलेल्या तहानुसार औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला  जायचं कबुल केलं. शिवाजी महाराजांसोबत संभाजीराजेही होते. छत्रपती शिवाजी महाराज हे मिर्झाराजेंशी केलेल्या तहानुसार, 12 मे 1666 रोजी मुघल सम्राट औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला पोहोचले.

औरंगजेबाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्ताने शिवाजी महाराज त्याच्या दरबारी गेले, पण औरंगजेबाने त्यांचा अपमान करण्यासाठी शेवटच्या रांगेत उभे केलं. शिवाजी महाराजांच्या समोर त्यावेळी जसवंतसिंह राठोड हा सरदार होता. याच जसवंतसिहाला मराठ्यांनी अनेकदा पळता भूई थोडी केलेली आणि त्याच्याच मागे एका राजाला उभं केल्याचा राज शिवाजी महाराजांना आला.

स्वाभिमानी शिवरायांनी मोडेन पण वाकणार नाही अशी भूमिका घेतली आणि भर सभेत डरकाळी फोडली. औरंगजेबाच्या सोडाच पण मुघलांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होत होतं. त्यानंतर राजांनी दरबार सोडले आणि आपल्या निवासस्थानी पोहोचले.

त्यानंतर शिवाजी महाराजांच्या विरोधात औरंगजेबच्या दरबारात कट-कारस्थान शिजलं आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. शिवाजी महाराज आणि संभाजीराजे या  दोघांनाही त्या ठिकाणी मारण्याचा कट औरंगजेबानं आखला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीनं आग्य्रातून सुखरूप सुटका (Chhatrapati Shivaji Maharaj escaped from Agra) करुन घेतली. या घटनेला मराठ्यांच्या इतिहासात (Maratha History) अनन्यसाधारण महत्त्व आहे.

1886 : भारतीय क्रांतिकारक रास बिहारी बोस यांचा जन्म

भारताचे थोर क्रांतिकारक तसेच सुभाष चंद्र बोस यांचे बंधू अशी ओळख असलेल्या रास बिहारी बोस (Rash Behari Bose) यांचा आजच्याच दिवशी म्हणजे 25 मे 1886 रोजी जन्म झाला. त्यांनी परदेशात राहून आझाद हिंद सेनेची स्थापना केली. रासबिहारी बोस यांनी तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड चार्ल्स हार्डिंज यांच्यावर दिल्लीत बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यामुळे त्यांच्यावर ब्रिटिश राजसत्तेविरोधात कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रास बिहारी बोस यांनी जपानला जाऊन इंडियन इंडिपेंडन्स लीग आणि आझाद हिंद फौज स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी हिंदू महासभेची जपानी शाखाही स्थापन केली आणि तिचे अध्यक्ष झाले. देशाला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी केलेले हे प्रयत्न त्यांच्या हयातीत यशस्वी होऊ शकले नसले तरी स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान फार मोठे आहे.

1895 : इतिहास संशोधक त्र्यंबक शेजवलकर यांचा जन्म

मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार, संशोधक त्र्यंबक शेजवलकर (Tryambak Shankar Shejwalkar) यांचा जन्म 25 मे 1895 रोजी झाला. त्र्यंबक शेजवलकर यांनी शिवकाल, पेशवेकाळातील इतिहासाविषयी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. निजाम आणि पेशवे संबंध, पानिपत (1761), श्रीशिवछत्रपती हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. श्री शिवछत्रपति: संकल्पित शिव-चरित्राची प्रस्तावना, आराखडा आणि साधने या ग्रंथासाठी शेजवलकरांना साहित्य अकादमी पुरस्काराचा (मरणोत्तर) बहुमान मिळाला.

1972 : दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याचा जन्म

करण जोहर (Karan Johar) हा एक भारतीय चित्रपट, दिग्दर्शक, निर्माता तसेच लेखक आहे. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी काही चित्रपट दिग्दर्शित केल्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्याला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. करणने आदित्य चोप्राच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका साकारून आपल्या बॉलिवूडमधील कारकिर्दीची सुरुवात केली. 1998 साली त्याने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.

2005 : अभिनेते सुनील दत्त यांचे निधन

सुप्रसिद्ध अभिनेता, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि राजकारणी अशी ओळख असलेल्या सुनिल दत्त (Sunil Dutt) यांचं निधन 25 मे 2005 रोजी झालं. दक्षिण आशियातील सर्वात जुने रेडिओ स्टेशन रेडिओ सिलोनमधून त्यांनी कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि ते मुंबईत आले. त्यांचा पहिला चित्रपट 1955 मध्ये 'रेल्वे प्लॅटफॉर्म' होता. परंतु 1957 मध्ये आलेल्या 'मदर इंडिया'ने त्यांना बॉलिवूड स्टार बनवले. दरोडेखोराच्या जीवनावर आधारित 'मुझे जीने दो' या त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाने त्यांना 1964 चा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून दिला. दोन वर्षांनंतर, 1966 मध्ये त्यांना खानदान चित्रपटासाठी पुन्हा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

1957 मध्ये मेहबूब खान यांच्या मदर इंडिया या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नर्गिसला आगीपासून वाचवताना सुनील दत्त गंभीरपणे भाजले होते. या घटनेने प्रभावित होऊन नर्गिसच्या आईने 11 मार्च 1958 रोजी आपल्या मुलीचे सुनील दत्त यांच्यासोबत लग्न लावून दिले. 1950 ते 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला साधना (1958), सुजाता (1959), मुझे जीने दो (1963), गुमराह (1963), वक्त (1965), खानदान (1965) यांसह अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. पडोसन (1967) आणि हमराज (1967) या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहेत.

सुनिल दत्त हे डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री होते. ते अभिनेता संजय दत्त आणि राजकारणी प्रिया दत्त यांचे वडील आहेत. 1968 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. 1984 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून पाच वेळा भारताच्या संसदेवर निवडून आले. सुनील दत्त शेवट 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटात दिसले होते. 2005मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

from maharashtra https://ift.tt/Z0hck8J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area