मुंबई:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जपून राहावं, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीकडे लक्ष देण्याचा सल्ला राज यांनी दिला. मुंबईमध्ये लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. खासदार अमोल कोल्हे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.

राज ठाकरे हे कायम त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांची भाषणं व मुलाखती कायम चर्चेचा विषय असतात. राज ठाकरेंनी कालच्या मुलाखतीत नेत्यांना दिलेले सल्ले हे सध्या चांगलेच चर्चेत आहे. अमृता फडणवीसांनी घेतलेल्या रॅपिड फायरमध्ये उत्तर देताना राज ठाकरेंनी शिंदे, फडणवीस, अजित पवारांना सल्ले दिले आहेत.

राज ठाकरेंनी काय सल्ले दिले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका शब्दात सल्ला दिला - जपून राहा

देवेंद्र फडणवीस -वर संबंध नीट ठेवा

अजित पवार- राज ठाकरे म्हणाले, काकांवर लक्ष ठेवा. तसेच यावर मी कोकणातील सभेत बोलणार आहे.

उद्धव ठाकरे- राज ठाकरे म्हणालेस मी काय सांगणार , ते स्वयंभू आहेत.

आदित्य ठाकरे - राज यांनी तेच ते (स्वयंभू ) उत्तर दिले.

देवेंद्र फडणवीसांना वेळ देण्याचा सल्ला

दरम्यान सर्वच मोठे राजकारणी व्यस्त असतात त्यांना घरी वेळ द्यायला मिळत नाही अशी सबब फडणवीस सतत देत असल्याची तक्रार देखील अमृता फडणवीसांनी राज ठाकरेंकडे केली. त्यावर राज ठाकरेंनी आपल्या शैलीत उत्तर दिले. "मला तुमच्या घरच्या प्रश्नांमध्ये पडायचं नाही" असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुढे ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे सत्तेमध्ये आहे. 2014 साली ते मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी पण खूप मोठी असते.कदाचित गेल्या काही सात आठ वर्षांमध्ये तुम्हाला ते वेळ देऊ शकले नसतील. परंतु त्याच्या आधी त्यांनी तुम्हाला वेळ दिला असून तुमचे फोटो पाहिलेत. परंतु मला ते भेटले की त्यांना वेळ देण्याचा सल्ला देईल आणि ठिकाणही सांगेल.

शर्मिला ठाकरे सक्रिय राजकारणात आल्या तर तुम्हाला चालेल का? असा प्रश्न देखील अमृता फडणवीसांनी राज ठाकरेंना विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, "मी घरचं काम करायला तयार आहे". त्यानंतर अमृता फडणवीस यांनी दुसरा प्रश्न विचारला. शर्मिला ठाकरे राजकारणात येऊन तुमच्या पुढे निघून गेल्या, तर तुम्हाला झेपेल का? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, "मला याची काहीच अडचण नाही. पण तुमच्या नंतर लक्षात येईल की राज ठाकरे परवडला"

पाहा व्हिडीओ :

from maharashtra https://ift.tt/69doIsv
Raj Thackeray Rapid Fire: शिंदेंनी जपून राहावं तर अजित पवारांनी काकांकडे लक्ष द्यावं; राज ठाकरेंचे नेत्यांना सल्ले
April 26, 2023
0
Tags