<p style="text-align: justify;"><strong>Gadchiroli :</strong> <a title="महाराष्ट्र" href="https://ift.tt/MzZvVSW" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a> दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli police) मोठी कामगिरी केली आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील मन्नेराजाराम परिसरात झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. रविवारी (30 एप्रिल) संध्याकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. मारल्या गेलेल्या तीन नक्षलवाद्यांमध्ये पेरीमली दलमचा कमांडर बेटलू मडावीचाही समावेश आहे. त्याशिवाय इतर दोन नक्षलवादीही मारल्याची माहिती मिळाली आहे.</p> <p style="text-align: justify;">विशेष म्हणजे मारला गेलेला नक्षली कमांडर बेटलू मडावी हाच पोलीस भरतीमध्ये गेलेल्या साईनाथ नरोटे या तरुणाच्या मार्च महिन्यात झालेल्या हत्येचा प्रमुख सूत्रधार होता. सध्या चकमक झालेल्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु असून चकमक थांबली आहे. या चकमकीमध्ये गडचिरोली पोलिसांना कुठलेही नुकसान झालेले नाही. </p>
from maharashtra https://ift.tt/5FGu4sa
Gadchiroli : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी, तीन नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
April 30, 2023
0
Tags