Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर <a href="https://ift.tt/CvrZE6g Sambhaji Nagar) जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत चक्क मास कॉपी सुरु असल्याचा प्रकार एका विद्यार्थीनीने समोर आणला होता. यावेळी पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून 300 ते 500 रुपये घेऊन उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यास देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. दरम्यान या सर्व प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी कॉलेजचे परीक्षा केंद्र कुलुगरू डॉ. प्रमोद येवले यांनी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तर या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही गठीत करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राशेजारी मास कॉपी सुरु असल्याचा आरोप एका विद्यार्थीनीने केला होता. पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून 300 ते 500 रुपये घेऊन उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यास देण्यात येत होत्या. धक्कादायक म्हणजे, महाविद्यालय परिसरातील फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडून हे सर्व पेपर ऑपरेट केले जात असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. सकाळी पेपर लिहताना कोरा ठेवायचा आणि पैसे देऊन पुन्हा तोच पेपर संध्याकाळी कॉपी करून लिहून दिला जात होता. मात्र एका विद्यार्थिनीने या सर्व प्रकरणाचा भांडाफोड केला आणि मोठी खळबळ उडाली. तर माध्यमांमध्ये बातम्या येताच विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून, शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी कॉलेजचे परीक्षा केंद्र कुलुगरू डॉ. प्रमोद येवले यांनी रद्द करण्याचे आदेश दिले आहे.

चौकशीसाठी समितीही गठीत

विद्यापीठ परीक्षेत मास कॉपी झाल्याचा प्रक्रार समोर आल्यावर, विद्यापीठ प्रशासनाने त्रिस्तरीय चौकशी समिती गठीत केली आहे. डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी कमिटी गठीत करण्यात आली आहे. तर या चौकशी समितीकडून 24 तासात चौकशी करून अहवाल विद्यापीठ प्रशासनाला दिला जाणार आहे. तर बुधवारी या समितीकडून सलग सहा तास चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे आता समितीचा अहवाल काय येणार आणि त्यावर विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मास कॉपीचा व्हिडिओ आला समोर...

संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राशेजारी मास कॉपी सुरु असल्याचा आरोप झाला आहे. तसेच या मास कॉपीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यात विद्यार्थी कॉपी करताना पाहायला मिळत आहे. कोणी पुस्तकात पाहून उत्तरे लिहत आहे, तर कोणी मोबाईलमध्ये पाहून उत्तरे लिहत आहे. तर काही ठिकाणी बेंचवर तीन-तीन विध्यार्थी बसले असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सोबतच पेपर लिहण्यासाठी पैश्यांची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीचा ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

काय सांगता! तीनशे रुपयात मिळतो पेपर लिहून, छत्रपती संभाजीनगरमध्ये भरतोय शिक्षणाचा बाजार

from maharashtra https://ift.tt/f7YW5RT
अखेर मास कॉपीप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील 'त्या' कॉलेजचे परीक्षा केंद्र रद्द; चौकशीसाठी समितीही गठीत
April 05, 2023
0
Tags