Ads Area
5 April In History: DD 10 मराठी वाहिनीचे नामकरण दूरदर्शन, दिव्या भारतीचा रहस्यमय मृत्यू; आज इतिहासात
मुंबई: आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने रसिकांच्या काळजावर राज्य करणारी अभिनेत्री दिव्या भारती हिचं आजच्या दिवशी म्हणजे, 5 एप्रिल 1993 रोजी निधन झालं. अवघ्या 19 व्या वर्षापर्यंत 14 चित्रपटात काम करणाऱ्या दिव्या भारतीची कारकीर्द तिच्या रहस्यमय मृत्यूने संपुष्टात आली. यासह इतिहासात आजच्या दिवशी कोणत्या घडामोडी घडल्या हे जाणून घेऊया
1908 : बाबू जगजीवनराम यांचा जन्म
स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री आणि भारताचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम हे मूळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रीय मंत्री राहण्याचा मान त्यांना मिळाला होता. त्यांनी केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री, कृषीमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि दूरसंचारमंत्री ही पदे भूषविली.
1922 : आर्य महिला समाजच्या संस्थापिका पंडिता रमाबाई यांचे निधन
पंडिता रमाबाई या परित्यक्ता, पतिता आणि विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या. पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे आणि लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. पंडिता रमाबाई यांनी त्यांचं आयुष्य महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी अर्पण केलं. स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा ही दोन त्यांची मुख्य उद्दिष्ट होती. स्त्री शिक्षणामध्ये रमाबाईंनी लावलेला हातभारामुळे त्यांना ब्रिटीश राजवटद्वारे पुरस्कार जाहीर करण्यात आला.
1993 : सौंदर्यवती अभिनेत्री दिव्या भारतीचं निधन
प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री दिव्या भारती हिचं निधन 5 एप्रिल 1993 रोजी झालं. अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) ही हिंदी चित्रपटांमधील प्रमुख अभिनेत्री होती, तिच्या सौंदर्याचे चाहते जगभर होते. 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबई येथे तिचा जन्म झाला. दिव्या भारतीने 1990 मध्ये तेलुगू चित्रपट 'बोबिली राजा'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'विश्वात्मा' या हिंदी चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. याच चित्रपटातील 'सात समुंदर पार' (Saat Samundar Paar) या गाण्याने तिला वेगळी ओळख मिळाली. 1992 पर्यंत भारतीने बॉलिवूडमध्ये एक यशस्वी नायिका म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. 1992 मधील 'दीवाना' मधील अभिनयामुळे तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. 1992-1993 च्या मध्यापर्यंत, भारतीने वयाच्या 19 व्या वर्षी 14 हिंदी आणि सात दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले होते. 1993 मध्ये त्यांच्या रहस्यमय मृत्यूने तिची कारकीर्दही संपुष्टात आली
1999 : भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस.एस. लॉयल्टी लंडनला रवाना
भारताच्या अतिशय समृद्ध अशा सागरी व्यापार आणि जहाज निर्माण क्षेत्राला ब्रिटीश सत्तेने अनेक वर्षे हेतुपुरस्सर प्रतिबंध केल्यानंतर दिनांक 5 एप्रिल 1919 रोजी पहिले भारतीय जहाज एस. एस. लॉयल्टी मुंबई येथून लंडनला रवाना झाले. त्यामुळे त्या दिवसाला आधुनिक नौकावहनाच्या पुनरुज्जीवनाचा आरंभ मानून राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो.
2000 : डीडी 10 वाहिनीचे दूरदर्शन असं नामकरण
पहिली मराठी उपग्रह वाहिनी डीडी 10 ची सुरुवात 15 ऑगस्ट 1994 रोजी झाली. त्यानंतर या वाहिनीचे दिनांक 05 एप्रिल 2020 ला अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते DD-10 चे दूरदर्शन सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
राष्ट्रीय सागरी दिन
from maharashtra https://ift.tt/eGYPW9X
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Below Post Ad
Ads Area