4rd April Headlines : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपने राज्यभर सावरकर यात्रा सुरु केली आहे. या यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने नागपुरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचा समारोप होत आहे. त्याचसोबत आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून त्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11.30 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यभरातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील. राज्यात लवकरच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा होईल तसेच स्थानिक परिस्थितीचा आढावा शरद पवार बैठकीमध्ये नेत्यांकडून घेतील.

सावरकर गौरव यात्रेचा समारोप

स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात सुरू केलेल्या सावरकर गौरव यात्रेचा आज समारोप आहे. आज दुपारी 4.30 वाजता नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा क्षेत्रात स्थानिक आमदार आणि नेत्यांच्या नेतृत्वात सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणातून निघणाऱ्या सहाही यात्रा संध्याकाळी 7 वाजता नागपूरच्या शंकर नगर चौकावर एकत्रित येतील. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धरमपेठ परिसरातून सावरकर गौरव यात्रेत सहभागी होतील आणि पायी शंकर नगर चौकापर्यंत येतील. अशाच पद्धतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही यात्रेत सहभागी होऊन शंकरनगर चौकात पोहोचतील. शंकरनगर चौकात एकत्रित सभेचे आयोजन करण्यात आले असून या समारोपीय सभेत देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी उपस्थित राहणार आहेत.

संत बाळूमामा मंदिर ट्रस्ट नवीन विश्वस्तांची नेमणूक होणार

सोमवारी कोल्हापूरमधे संत बाळूमामाच्या विश्वस्तांमध्ये जोरदार हाणामारी झाली. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास आदमापूर येथे बाळूमामाच्या मंदिरामध्ये नवीन विश्वस्तांची नेमणूक केली जाणार आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूचे विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे काल झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर आज गोंधळाची शक्यता आहे.

from maharashtra https://ift.tt/4b1Bi0F
4rd April Headlines : राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक, सावरकर यात्रेचा समारोप; आज दिवसभरात
April 03, 2023
0
Tags