Ads Area

26 April In History : महान गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे निधन, सिक्किम भारताचे 22 वे राज्य बनले; आज इतिहासात

26 April In History : 26 एप्रिल ही तारीख अनेक कारणांसाठी इतिहासात महत्त्वपूर्ण आहे, त्यापैकी एक म्हणजे या दिवशी सिक्कीमचा भारतामध्ये समावेश झाला आणि ते देशाचे 22 वे राज्य बनले. याआधी, राज्यात 14 एप्रिल रोजी जनमत घेण्यात आले आणि जनतेने भारतीय संघराज्यात समावेशाच्या बाजूने मतदान केले. चीन वगळता इतर सर्व देशांनी त्याला मान्यता दिली.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 26 एप्रिल या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे:-

1920 : महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजम यांचे निधन

श्रीनिवास रामानुजन अय्यंगार (Srinivasa Ramanujan) हे आधुनिक काळातील महान भारतीय मानले जाते. त्यांना गणिताचे कोणतेही विशेष प्रशिक्षण मिळाले नाही, तरीही त्यांनी विश्लेषण आणि संख्या सिद्धांत या क्षेत्रात मोठे योगदान दिले. आपल्या प्रतिभेने आणि समर्पणाने त्यांनी गणिताच्या क्षेत्रात अनेक अद्भुत शोध लावले. अलीकडे त्यांची सूत्रे क्रिस्टलोग्राफीमध्ये वापरली गेली आहेत.

1948 : अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचा जन्म

भारतीय अभिनेत्री मौसमी चॅटर्जी (Moushumi Chatterjee) यांचं आजच्या दिवशी म्हणजे 26 एप्रिल 1948 रोजी निधन झालं. ज्या हिंदी तसेच बंगाली चित्रपटांमध्ये त्यांच्या कामासाठी विशेष ओळखल्या जातात. 1970 च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. तिने 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

1975: सिक्कीम हे भारताचे 22 वे राज्य बनले

सन 1642 मध्ये सिक्कीम (Sikkim) अस्तित्वात आले. जेव्हा फुंट्सॉन्ग नामग्याल यांना सिक्कीमचा पहिला चोग्याल (राजा) घोषित करण्यात आले. नामग्याल यांना तीन बौद्ध भिक्खूंनी राजा घोषित केले होते. अशा प्रकारे सिक्कीममध्ये राजेशाही सुरू झाली. त्यानंतर नामग्याल घराण्याने सिक्कीमवर 333 वर्षे राज्य केले.

सिक्कीमचे भारतातील विलिनीकरण 1947 मध्ये त्या देशाने बहुमताने नाकारलं होतं आणि तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सिक्कीमला संरक्षित राज्याचा दर्जा दिला. या अंतर्गत भारताचे सिक्कीमचे संरक्षण झाले. भारताने सिक्कीमच्या परकीय, राजनैतिक किंवा संपर्क प्रकरणांची जबाबदारी घेतली.

1955 मध्ये एक राज्य परिषद स्थापन करण्यात आली ज्या अंतर्गत चोग्याल घराण्याला घटनात्मक सरकार स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान, सिक्कीम नॅशनल काँग्रेसने पुन्हा मतदान आणि नेपाळींना अधिक प्रतिनिधित्व देण्याची मागणी केल्याने राज्यात गोंधळ निर्माण झाला. 1973 मध्ये राजभवनासमोर झालेल्या दंगलीमुळे भारत सरकारला सिक्कीमला संरक्षण देण्याची औपचारिक विनंती करण्यात आली. चोग्याल घराणे सिक्कीममध्ये लोकप्रिय नव्हते.

एप्रिल 1975 मध्ये भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये प्रवेश केला आणि राजधानी गंगटोक ताब्यात घेतला. दोन दिवसांत संपूर्ण सिक्कीम राज्य भारत सरकारच्या ताब्यात आले. सिक्कीमच्या 97.5 टक्के लोकांनी सिक्कीमचा भारतीय प्रजासत्ताकात समावेश करण्याच्या प्रश्नाला पाठिंबा दिला. आजच्याच दिवशी सिक्किमचे भारतात विलिनीकरण करण्यात आलं. काही आठवड्यांनंतर, 16 मे 1975 रोजी, सिक्कीममधील राजेशाही संपुष्टात आणून, सिक्कीम औपचारिकपणे भारतीय प्रजासत्ताकचे 22 वे राज्य बनले.

1976 : साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचे निधन

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू हे एक मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार. आरती प्रभू ह्या नावाने त्यांनी  कवितालेखन केले. 1978 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार – 'नक्षत्रांचे देणे' त्यांना प्रदान करण्यात आला. जोगवा (1959), दिवेलागण (1962), नक्षत्रांचे देणे (1975). कादंबऱ्या : रात्र काळी घागर काळी (1963), अजगर (1965), कोंडुरा (1966), त्रिशंकू (1968). नाटके : एक शून्य बाजीराव (1966), सगेसोयरे (1967), अवध्य (1972), कालाय तस्मै नमः (1972). कथासंग्रह : सनई (1964), गणुराया आणि चानी (1970), राखी पाखरू (1971) हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह.

1986 : रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट

चेर्नोबिल, युक्रेन मधल्या अणुभट्टीचा 26 एप्रिल 1986 रोजी अपघाती स्फोट झाला. हिरोशिमाच्या तुलनेत चेर्नोबिलमधे जीवितहानी खूप कमी असली, तरी या अपघातामुळे हिरोशिमाच्या चारशे पट अधिक किरणोत्सर्गी वायू आणि सुक्ष्मकण पृथ्वीच्या वातावरणात फेकले गेले. या अपघाताचा सर्वात जास्त फटका बेलारूस प्रांतातल्या लाखो नागरिकांना कर्करोग, अर्भकांची अपुरी मानसिक वाढ आणि जनुकांमधले उत्परिवर्तन या व्याधींच्या स्वरूपात बसला.

from maharashtra https://ift.tt/19NHMzV

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area