मुंबई: राज्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसंबंधात आज होणाऱ्या कॅबिनेटमध्ये काहीतरी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचसोबत आजच्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे,

आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक

आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अवकाळी पावसाने राज्याचं किती नुकसान झालेलं आहे याचा आढावा घेतला जाईल. त्याचसोबत राज्यातील कोविडची परिस्थिती काय आहे याचाही आढावा घेतला जाणार आहे. आजच्या कॅबिनेट मधून शेतकऱ्यांना मदत मिळणार का? याकडे लक्ष आहे.

आज राज्यात काही ठिकाणी गारपिठीची शक्यता

देशातील पूर्व भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच महाराष्ट्रातील तापमान जैसे थे राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. सोबतच काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे. मात्र विदर्भात अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीशी पार पोहोचलंय. अशात काळजी घेण्याचं आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलंय.

वाशिमच्या जैन मंदिरातील भगवान पार्श्वनाथ मूर्ती लेपन प्रक्रियेला दुसऱ्यांदा सुरुवात

जैन धर्मियांची काशी असलेल्या वाशिममधील शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्ती लेपन प्रक्रियेला दुसऱ्यांदा सुरूवात झाली आहे. पहिली लेपन प्रक्रिया कोणत्याही वादविवाद शिवाय पूर्ण होऊन जवळपास 25 दिवस पूर्ण झाली. आता दुसरी लेपन प्रक्रिया सात दिवस चालणार असून त्या नंतर पुढचे 15 ते 20 दिवसानंतर मूर्तीचे दर्शन भाविकांकरीता खुले होणार असून लेपन प्रक्रिया होईपर्यंत खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने मंदिर परिसरात कलम 144 लागू करण्यात आली.

नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर सुनावणी

वैद्यकीय कारणांसाठी जामिनाची मागणी करत नवाब मलिकांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. नवाब मलिकांच्या वतीनं त्यांचे वकील आज कोर्टात बाजू मांडणार आहेत.

धाराशिव श्री कालभैरवनाथ जोगेश्वरीच्या यात्रेचा दुसरा दिवस

श्री कालभैरवनाथ जोगेश्वरीच्या नावान चांगभलच्या जयघोषात सोनारीतील मानाचा रथोत्सव जल्लोषात. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक हजर रहातील. राज्यातील लाखो कुंटूबाचे कुलदैवत असलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातील सोनारीचे श्री काळभैरवनाथ- जोगेश्वरीचा मानाचा रथोत्सव जल्लोषात पार पडत आहे. लाखो भाविकांची उपस्थिती असल्याने चांगभलच्या जयघोषात दुमदुमुन आणि गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत माखून गेला होता. यात्रेचा आज दुसरा दिवस आहे.

समलैंगिक विवाह संबंधाबाबत सुनावणी

समलैंगिक विवाह संबंधाबाबत सुप्रिम कोर्टात सुरू असलेली सुनाणी आज सुद्धा होणार आहे. कालच्या सुनावणी दरम्यान समानता आणि सन्मानाने जगण्यासाठी समलौंगिक वावाहाला मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे.

शहीद अमोल गोरेच्या पार्थिवावर आज वाशिममध्ये अंतिम संस्कार

भारतीय सैन्यदलात अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असलेल्या जिल्ह्यातील सोनखास गावातील अमोल गोरे या 33 वर्षीय जवानाला वीरमरण आलंय. अरुणाचल प्रदेशातील वापरी यांग बुल नाला येथे 14 एप्रिल रोजी हिमसख्खलन झाल्याने काही जवान बेपत्ता झाले होते. याच दुर्घटनेत अमोल गोरे यांना वीरमरण प्राप्त झाले. अमोल गोरे सैन्यदलात नायक या पदावर कार्यरत होते. तर ते दि 26 मार्च 2011 ला सैन्यदलात भरती झाले होते. आज त्यांचे पार्थिव राहते गाव सोनखास येथे आणण्यात येणार असून त्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

from maharashtra https://ift.tt/97dvOI0
19th April Headlines: आज कॅबिनेट बैठक, राज्यात आज काही ठिकाणी गारपिटीची शक्यता; आज दिवसभरात
April 18, 2023
0
Tags