17th April Headlines : आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. राज्यपाल नियुक्त 12 आमदार याचिकेवर सुप्रिम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. तसेच दिल्ली विधानसभेचं आज एक दिवसाचं अधिवेशन होणार आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात लढत होणार आहे. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..

दिल्ली

- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताहाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी चांगलं काम करणाऱ्या पंचायतीला पुरस्कार दिला जाणार आहे.

- राज्यपाल नियुक्त 12 आमदार याचिकेवर सुप्रिम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.

- दिल्ली विधानसभेचं आज एक दिवसाचं अधिवेशन होणार आहे. यावेळी अरविंद केजरीवालांना सीबीआयची नोटीस, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांच्या अटकेवरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. तर दिल्ली विधानसभेच्या बाहेर केजरीवाल विरोधात भाजप आंदोलन करणार आहेत.

कर्नाटक

राहुल गांधीच्या कर्नाटक दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. बीदर जिल्ह्यातील भल्की आणि हुमानाबाद येथे दोन सभांना संबोधित करणार आहेत.

मुंबई

- पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आजपासून हायकोर्टात विशेष सुनावणी सुरू होणार आहे. तसेच या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याकरता संजय राऊत सकाळी 11 वाजेपर्यंत मुंबई सत्र न्यायालयात हजेरी लावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

- पंतप्रधान आवास योजनेतील 7849 घरांची लॉटरी काढताना सिडकोने अल्पउत्पन्न गटातील सोडत धारकांना उलवे नोड येथे 35 लाखांच्या किमतीत घरांचे दर ठेवल्याने हे दर कमी करावेत म्हणून सिडकोसोडत धारक लढा देत आहेत. याचाच भाग म्हणून आज सिडको सोडतधारक मोठ्या संख्येने शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

पुणे

- कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कॉंग्रेसकडून राज्यभर पुकारण्यात आलेल्या शर्म करो आंदोलनाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर राहणार आहेत.

बारामती

विरोधी पक्ष नेते अजित पवार सकाळी 9 वाजल्यापासून पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 वाजता वडकी भागातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन. त्यानंतर भिवरी गावातील विकास कामांचे भूमिपूजन आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता सासवड शहरात युवक आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

- शरद पवार हे बारामतीतील कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत.

सांगली

- आटपाडी तालुक्यातील खरसुंडी मधील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस असून सासनकाठी गुलालाच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. हा सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू कर्नाटकसह अनेक राज्यातून लाखो भाविक श्री सिद्धनाथाच्या खरसुंडी नगरीत दाखल होतात.

from maharashtra https://ift.tt/arMGDOW
17th April Headlines : दिल्ली विधानसभेचं आज एक दिवसाचं अधिवेशन, राज्यपाल नियुक्त 12 आमदार याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी; आज दिवसभरात
April 16, 2023
0
Tags