14th April Headlines : आज मुंबईसह राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री आज रात्री मुंबईत दाखल होणार आहेत. भाजप नेत्यांसोबत त्यांची बैठक पार पडणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक असणार आहे. तर, मुंबईतील मालवणीत सामाजिक एकतेसाठी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. श्रीराम नवमीच्या दिवशी या भागात दोन गटात वाद झाला होता.

मुंबई

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री मुंबईत दाखल होणार आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, त्यासाठी शाह मुंबईत दाखल होणार आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आहे. या बैठकीत अमित शहा घेणार मिशन 45 चा आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीचाही आढावा घेणार आहेत.

- कर्नाटक निवडणुकीच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक... राष्ट्रवादीच्या कर्नाटकातील पदाधिकाऱ्यांसोबत अध्यक्ष शरद पवार सकाळी चर्चा करणार आहेत.

- मुंबई सेंट्रल चे नामकरण नाना शंकर शेठ मुंबई टर्मिनस करा ! मागील दहा वर्षापासून मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकर शेठ मुंबई टर्मिनस नामकरण करण्यासाठी रेल्वे दिनाचे औचित्य साधून राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मूक निदर्शने नाना चौकात करण्यात येणार आहेत.

- मालाड-पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार अस्लम शेख हे आज मालवणी, मालाड-पश्चिम येथून निघणाऱ्या सर्वधर्मिय 'मूक मोर्चा'त सहभागी होणार आहेत. मालाड- मालवणीतील शांतता, ऐक्य, सलोखा अबाधित रहावा यासाठी सर्वधर्मीय नागरीक, 60 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्था, व्यापारी, दुकानदार हजारोंच्या संख्येने या 'मूक मोर्चा'त सहभागी होणार आहेत.

पुणे

- पुण्याच्या मधोमध असलेली वेताळ टेकडी फोडून तीन बोगदे करण्याचा पुणे महापालिकेचा विचार आहे. मात्र पुण्यातील नागरिक, सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून या प्रकल्पला जोरदार विरोध करण्यात येतोय. त्यासाठी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता वेताळ बाबा चौक ते बालभरती चौकापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी होणार आहेत.

- बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेना-शिंदे गटाची जाहीर सभा होणार आहे. शिवसेना-शिंदे गटाचे उपनेते विजय शिवतारे आणि सांगोल्याचे खासदार शहाजी पाटील हे नीरा नरसिंहपूर येथे सभा घेणार

नागपूर

- महाविकास आघाडीची उद्या नागपूरात वज्रमुठ सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते सभेला संबोधित करणार आहेत. या सभेची तयारी अंतिम टप्यात आली आहे.

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रचर कॉर्पोरेशन लिमिटेड कडून विदर्भात बांधण्यात आलेल्या सहा उड्डाणपुलाचे उद्घाटन आणि पूर्व नागपूर व पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या महत्वाच्या अजनी अजनी रेल्वे पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

यवतमाळ

- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता उत्सव मंगल कार्यालयात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

रत्नागिरी

- भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत.

from maharashtra https://ift.tt/nYNfcbQ
14th April Headlines: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, मालवणीत सामाजिक एकतेसाठी मूक मोर्चा; आज दिवसभरात
April 14, 2023
0
Tags