Tehsildars Transfers : अवकाळी पावसामुळं (unseasonal rain) राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं (Agriculture Crop) मोठं नुकसान झालं आहे. मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही पाहायला मिळत आहेत. अनेकदा या मुद्यावरुन सभागृह तहकूबही करण्यात आलेलं होतं. सरकारच्या वतीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. काही ठिकाणी पंचनामे सुरुही आहेत. मात्र, अशातच राज्यातील 36 तहसीलदारांच्या बदल्या (Tehsildars Transfers) करण्यात आल्या आहेत. या मुद्यावरुन देखील विरोधक आज सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची मुख्य जबाबदारी तहसीलदार आणि इतर यंत्रणावरती आहे. अशातच 36 तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत. अचानक बदल्या केल्यामुळं शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब होणार का? असा सवालही उपस्थित केला जातोय. दरम्यान, कालच विधनसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (9 मार्च) विधानसभेत 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला. यावर आज 293 अन्वये विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यावरुन देखील आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच कांदा प्रश्न आणि अवकाळी पाऊस या दोन्ही मुद्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान

पालघर

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि जव्हार तालुक्यात या भागात 760 हेक्टरचे आंबा आणि काजूचे नुकसान झाले आहे.

नाशिक

नाशिक जिल्ह्यात 2 हजार 685 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. यामध्ये गहू, भाजीपाला, आंबा पिकांचा समावेश आहे.

धुळे

धुळे जिल्ह्यात 3 हजार 144 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी पिकांचे नुकसान झाले आहे.

नंदूरबार

नंदूरबार जिल्ह्यात 1 हजार 576 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. यामध्ये मका, गहू हरभरा, ज्वारी, केळी, पपई ,आंबा या पिकांचं नुकसामन झालं आहे.

जळगाव

जळगाव जिल्ह्यात 214 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठं नकुसान झालं आहे.

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं नुकसान झालं आहे. 4 हजार 100 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे.

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात 775 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे.

वाशिम

वाशिममध्ये 475 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं आहे. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.

राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान

अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rain) राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकरी नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी विधीमंडळात ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/JGxVyOS Fadnavis : अवकाळीचा तडाखा, आठ जिल्ह्यात 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचं नुकसान; फडणवीसांचं शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन

from maharashtra https://ift.tt/6fwzoJd
Tehsildars Transfers : एकीकडे अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु, दुसरीकडे 36 तहसीलदारांच्या बदल्या
March 09, 2023
0
Tags