Success Story : शेती क्षेत्रात सातत्यानं बदल होत आहे. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील गोरेगाव (Goregaon) तालुक्यातील सोनी या गावातील कैलास बिसेन (Kailas Bisen) या शेतकऱ्याने गवती चहा (Lemon Grass) आणि सिट्रोनिला (Citronella) वनस्पतीच्या शेतीचा वेगळा प्रयोग केला आहे. प्रतिकुल भौगोलिक वातावरण असतानाही या शेतकर्‍यानं एक एकर शेतीमध्ये गवती चहा आणि सिट्रोनिला वनस्पतीची लागवड केली आहे. त्या एक एकरमध्ये त्यांना जवळपास एक लाख ते एक लाख 20 हजार रुपपर्यंतचे उत्पन्न होईल अशी आशा आहे.

तांदळाची शेती परवडत नसल्यानं पर्यायी शेतीचा मार्ग

गोरेगाव तालुक्यातील सोनी या गावातील कैलास बिसेन या शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे. या शेतीमध्ये ते तांदळाचे पीक घेत असतात. तांदूळ पिक घेण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी लागते. मात्र, दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात असल्यानं आणि खत, कीटकनाशके यांच्या वाढत्या किंमतीमुळं तांदळाची शेती परवडत नसल्यानं त्यांनी एक एकर शेतीमध्ये गवती चहा आणि सिट्रोनिला वनस्पतीची लागवड केली आहे. त्या एक एकरमध्ये त्यांना जवळपास एक लाख ते एक 20 हजार रुपयापर्यंत उत्पन्न होईल अशी आशा आहे. एक लिटर सिट्रॉनिलच्या तेलला 750 ते 800 रुपयांचा दर मिळतो तर गवती चहाच्या 1 लिटर तेलाला 1200 ते 1500 रुपयापर्यंतचा दर मिळतो. यासाठी मुंबई आणि नागपूरमध्ये बाजारपेठा उपलब्ध आहेत.

गवती चहा आणि सिट्रॉनिला या औषधी वनस्पती

आजच्या घडीला शेतीचा एकमेव उद्देश म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करणे. पण त्यातही शेतकरी पारंपरिक पद्धतीनं शेती करतो, त्यामुळं जरी उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केला तरीही शेतकऱ्याला जास्त काही लाभ होत नाही. शेतकरी आता स्ट्रॉबेरी, मशरुम यासारख्या पिकावर आपलं भाग्य आजमावत आहेत. गवती चहा आणि सिट्रॉनिला या औषधी वनस्पती आहेत. ज्याचे आरोग्यासाठी भरपूर असे फायदे आहेत. याचा वापर औषध, कॉस्मेटिक आणि डिटरजंटमध्ये केला जातो. कमीत कमी गुंतवणूक करुन सर्वात जास्त नफा मिळवून देणारी ही अशी औषधी वनस्पती आहे. परफ्यूम, साबण, निरमा, डिटर्जंट, तेल, केसांचे तेल, डासांचे लोशन, डोकेदुखीची औषधे आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी लेमनग्रास वनस्पती सर्वाधिक वापरली जाते.

भविष्यात पाच ते सात एकर क्षेत्रात गवती चहा आणि सिट्रोनिलाची लागवड करणार

कैलास बिसेन यांनी आपल्या शेतातील एक एकरमध्ये सिट्रोनिला आणि गवती चहा वनस्पतीची लागवड केली आहे. भविष्यात पाच ते सात एकर क्षेत्रात ही लागवड करण्याचा त्यांचा निर्धार आहे. या शेतीच्या माध्यमातून एक एकरमध्ये एक लाख रुपयांचा नफा मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. इतर शेतकऱ्यांनीही पारंपारिक शेतीला बगल देत शेतीत नवनवीन प्रयोग करुन विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/7qoHYSx story : वाशिमचे खरबूज काश्मीरला, 82 दिवसात लाखोंचा नफा; वाचा राधेश्याम मंत्र्यांची यशोगाथा

from maharashtra https://ift.tt/MlL6Gdn
Success Story: पारंपारीक तांदूळ शेतील बगल, गोदिंयाच्या मातीत गवती चहा आणि सिट्रोनिलाचा प्रयोग
March 23, 2023
0
Tags