Ads Area

Nanded News : अखेर शंकर अण्णा धोंडगे यांनी हाताचं घड्याळ सोडलंच; BRS मध्ये होणार पक्षप्रवेश

Maharashtra Nanded Political New: कंधार (Kandahar) जिल्ह्यात मोठ्या चेहऱ्याच्या शोधात असलेल्या बीआरएसला (Bharat Rashtra Samithi) शेतकरी नेते आणि माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे (Shankaranna Dhondge) यांच्यासारखा शेतकरी चेहरा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीआरएसच्या सातत्याने संपर्कात असलेल्या शंकर धोंडगे यांनी सोमवारी (13 मार्च) बाळंतवाडी येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी किसान प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत बीआरएसचा 'अबकी बार, किसान सरकार' असा नारा दिला.

तेलंगणातील टीआरएसने आपल्या पक्षाच्या विस्तार करण्यासाठी 5 फेब्रुवारीला जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी 'अब की बार, किसान सरकार'ची घोषणा दिली. केसीआर यांनी नांदेडला सभा घेतली. कंधार लोहा मतदारसंघाचे माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी अनेक शेतकरी आंदोलनं केली आहेत. ते शेतकरी चळवळीतील नेते आहेत. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेकांनी बीआरएस पक्षात यापूर्वीच प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वी धोंडगे यांनी मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली होती. त्यामुळे धोंडगे बीआरएसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर मात्र त्यांनी योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

सोमवारी कंधार येथील बाळांतवाडी येथे एसआरटी कॉलेजला लोहा-कंधार मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये धोंडगे म्हणाले की, "तेलंगणा राज्यात स्थलांतर लोकांचं होत होतं. केसीआर यांनी आठ वर्षांमध्ये होत्याचं नव्हतं करुन दाखवलं. महाराष्ट्रामध्ये धनाची कमी नाही आणि मानाची कमी नाही, पण शेतकरी आत्महत्या का करतात?" "माझा कोणावरही राग नाही. आम्ही कोणावर टीकाही करणार नाही," असंही ते म्हणाले. धोंडगे यांचे सुपूत्र शिवराज धोंडगे यांच्यासह मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा देत धोंडगे यांना समर्थन दिलं आहे.

"खात्री देतो की माझ्या राजकारणात चुका झाल्या असतील. बरेच जण म्हणतात राजकारण तुम्हाला काही जमलं नाही. मी सगळ्यांना आश्वासित करतो, एका तोळ्याचासुद्धा धक्का लागू देणार नाही. माझी प्रेरणा आणि इच्छा अशी सांगते की, निवडणुकीचा काही नेम नाही. आजची परिस्थिती राजकारणात काही स्थिर नाही. तुमच्या सगळ्यांचे प्रेरणा, आशीर्वाद असतील तर मी आज काही भूमिका जाहीर करणार नाही," असंही धोंडगे म्हणाले.

'जो किसानो की बात करेगा, वही राज करेगा'

आपण घेतलेला निर्णय नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रासाठी यशस्वी ठरेल. बळीराजाच्या मिशनमध्ये निश्चितपणे काम करु. महाराष्ट्रासह मराठवाड्यात तासाला एक शेतकरी आत्महत्या करत असेल, तर आता गप्प बसून चालणार नाही.

"तेलंगणातील शेतकरी आत्महत्या बंद झाल्या आहेत. महाराष्ट्रातून टीका होतील. पण एकदा जंगलाला आग लागल्यावर भले भले जळून खाक होतील. दोनच दिवसांच्या अनुभवातून किती फोन येत आहेत. मी फक्त तुमच्या सहमतीची वाट पाहत होतो, तुम्ही सहमती दिली," असं धोंडगे म्हणाले. त्यानंतर 'आपकी बार, किसान सरकार'चे नारे देण्यात आले, जो किसानो की बात करेगा वही राज करेगा, असं म्हणत धोंडगे यांनी आपली भूमिका मांडली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/lCWIEGU News : शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे BRS च्या संपर्कात? हैदराबादमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा

from maharashtra https://ift.tt/IgLWxal

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area