Ads Area

Maharashtra Weather : ढगाळ वातावरण असलं तरी अवकाळीची शक्यता नाही, वाचा पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) जाणवत आहे. कुठे उन्हाचा कडाका आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. दरम्यान, मागील दोन दिवस हवामान विभागानं (Meteorological Department) राज्यात अवकाळी पावसाचा (unseasonal rain) अंदाज वर्तवला होता. मात्र, आजपासून (1 एप्रिल) पुढील 5 दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाची शक्यता जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली. जरी काही भागात ढगाळ वातावरण असले तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे खुळे म्हणाले.

शेतकऱ्यांनी पिकांची काढणी सुरु करावी

हवामान विभागानं महाराष्ट्रात 30 आणि 31 मार्चला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणं राज्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावल्याचे पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. मात्र, आजपासून पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता जाणवत नाही. त्यामुळं काढणीला आलेल्या पिकांची शेतकऱ्यांनी काढणी सुरु करावी असे आवाहन देखील खुळे यांनी केलं आहे. जास्तीत जास्त विदर्भात काही प्रमाणात अवकाळी पावसाची शक्यता जाणवत आहे.

6 एप्रिल ते गुरुवार 9 एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

दरम्यान, 6 एप्रिल ते गुरुवार 9 एप्रिल पर्यंतच्या चार दिवसात सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील ( बुलढाणा, वर्धा नागपूर जिल्हे वगळता  अन्य जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकणातील 4 जिल्हे तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात वातावरणात बदल जाणवत आहे. आजपासून संपूर्ण एप्रिल महिन्यात अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवत नसल्याचे खुळे म्हणाले.

15 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही

2 एप्रिलपासून दुपारच्या तापमानात काहीशी वाढ होत असली तरी येत्या 15 दिवसापर्यंत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नाही. कदाचित संपूर्ण एप्रिल महिनाही उष्णतेच्या लाटेविना जाण्याची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले. वैष्णोदेवी, काश्मीर व्हॅली, बद्रीनाथ केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सिमला कुलू मनाली, देहाराडूनसह थेट अमृतसर सभोवतालचा परिसरात आज आणि उद्या अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवते. तिकडे जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन खुळे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/zugPTU7 Nino : एल निनोचा प्रभाव, महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट येण्याची शक्यता; अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्थेचं भाकित

from maharashtra https://ift.tt/KITZseV

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area