Ads Area

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत; आजही पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : राज्यातील तापमानात (Temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे ढगाळ वातावरण होत आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. सातारा (Satara) जिल्ह्यासह पुणे (Pune), धुळे, वर्धा जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळं शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Satara pune Rain : साताऱ्यात अडीच तास विद्युत प्रवाह बंद

बुधवारी रात्री सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं झोडपलं. या पावसामुळं काही काळ सातारा शहरातील विद्युत प्रवाह बंद होता. मिळालेल्या माहितीनुसार अडीच ते तीन तासानंतर साताऱ्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाटासह शिवाजीनगर, कसबा परिसरात जोरदार पाऊस झाला. तसेच पिंपरी चिंचवड शहरात देखील पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.

18 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची  शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे. अशातच आता पावसाचा (Rain) अंदाज वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या कांदा, गहू, हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे. अशातच पाऊस आल्यास पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवसाच्या कमाल तापमानातही दोन अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता घेऊन हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.

आज मराठवाड्यासह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

गुरुवार दिनांक 16 मार्च ते 18 मार्चपर्यंत तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. विशेषतः पावसाच्या तीव्रतेची निश्चिती मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात अधिक जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/RJbA5ne Rain: राज्यात पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा, 18 मार्चपर्यंत अलर्ट जारी

from maharashtra https://ift.tt/OkSGmX6

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area