Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आजपासून आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. त्याचसोबत आज अनिल जयसिंघानी, जावेद अख्तर, चंदा कोचर, श्रद्धा वालकर यांच्यासंबंधित याचिकांवर सुनावणी होणार आहे. याचसोबत आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे...

अनिल जयसिंघानी यांच्या अटकेच्या याचिकेवर सुनावणी

अमृता फडणवीस प्रकरणात अटक आरोपी अनिल जयसिंघानीनं अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. आपल्या विरोधात दाखल FIR दाखल करण्यापासून अटक करेपर्यंत पोलिसांनी कायदेशीर बाबींच उल्लंघन केल्याचा दावा अजय जयसिंघानी यांनी या अर्जात केला आहे.

जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर सुनावणी

आरएसएसची तुलना तालीबानशी करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावरील वादावर मुलुंड कोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयानं जावेद अख्तर यांना याप्रकरणी दिलासा द्यायला नकार दिल्यानं, आज जावेद अख्तर कोर्टात हजर होतात का हे पाहणं महत्वाचं आहे.

आयपीएलचा हंगाम सुरू

आजपासून आयपीएलच्या नव्या सीजनला सुरूवात होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

कलिना लायब्ररी लाच प्रकरणी याचिकेवर सुनावणी

पीएमएलए कोर्टात कलिना लायब्ररी कामात लाच घेतल्याचा आरोपांच प्रकरण न्यायालयात असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळांवर दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. नाशिक फेस्टिवलसाठी ही लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भुजबळांसह इतरांनी ही केस डिस्चार्ज करण्यासाठी एक याचिका दाखल केली आह.

चंदा कोचर यांच्या विरोधातील सीबीआयच्या रिमांड अॅप्लिकेशनवर सुनावणी

सीबीआय कोर्टात चंदा कोचर विरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या रिमांड अप्लिकेशनवर आज सुनावणी होणार आहे. कोर्टानं जर सीबीआयची विनंती मान्य केली तर चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

श्रद्धा वालकर प्रकरणात आज साकेत कोर्टात सुनावणी

श्रद्धा वालकर प्रकरणात आज साकेत कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने आफताबला ताकिद दिली होती कि पुन्हा वकिल बदलला तर बाजू मांडायला वेळ दिला जाणार नाही.

from maharashtra https://ift.tt/q5caHxU
Maharashtra News Updates 31th March 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
March 30, 2023
0
Tags