Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

मुंबईसह राज्यात अवकाळीचा कहर सुरुच, शेती पिकांचं नुकसान

Unseasonal Rain : सध्या राज्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rains) जोर कायम आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली. दरम्यान, या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेकऱ्यांची (Farmers) पिकं जमिनदोस्त झाली आहेत. सध्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत.

पुन्हा कोरोनाचा वाढता धोका, आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी

<a href="https://ift.tt/8wpFmsC Corona Guidelines : देशात एकीकडे <a href="https://ift.tt/eJdy54w विषाणूचा (H3N2 Influenza) संसर्ग वाढत असतना दुसरीकडे पुन्हा एकदा कोरोना विषाणूनं (Coronavirus) डोकं वर काढलं आहे. कोविडच्या (Covid19) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचने कोरोनाचा वाढता धोका पाहता नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मंत्रालयाने सांगितलं आहे की, पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. बॅक्टेरियल एन्फेक्शन (Bacterial Infection) झाल्याची शंका असल्यास अँटीबायोटिकचा वापर करु नये.

सरकारी कर्मचारी संपाचा आज सातवा दिवस

राज्यातील सरकारी, निमसरकरी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीचा संप आणखी तीव्र करणार, या आठवड्यात संपाचा पुढच्या टप्यातील कार्यक्रम संघटनांकडून जाहीर संपाचा 7 दिवस असून सरकार कडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने 18 लाख संपकऱ्यांनी आपला संप अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून संघटनांनी पुढील आठवड्याचा संपाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवारी राज्यातील शाळांमध्ये कॉलेज,कार्यलयामध्ये थाळीनाद आंदोलन करत सरकारच्या मागणी संदर्भातील नकारात्मक भूमिकेचा धिक्कार केला जाणार आहे. त्यानंतर 23 मार्च काळा दिवस पाळला जाणार आणि 24 मार्च माझे कुटुंब माझी पेन्शन अभियान राज्यभर राबविले जाणार आहे.

विधीमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती चर्चा आणि उत्तर होईल. मुंबईच्या चर्चेवर सत्ताधारी आमदारांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावर नगरविकास विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उत्तर देतील. यावेळी सत्ताधारी आमदारांनी अनेक मुद्यांवर चौकशीची मागणी केली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62 हजार 480 हेक्टर वरील पिकांचं अवकाळी मुळे नुकसान झाला आहे. तर पावसामुळे आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. आत्तापर्यंत 76 जनावरे देखील या अवकाळी पावसामुळे दगावले आहेत. आता विरोधकांकडून लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. या मुद्द्यावरुन सभागृहात आज गोंधळ होण्याची शक्यता आहे.

from maharashtra https://ift.tt/OSzV1Qb
Maharashtra News Live Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
March 19, 2023
0
Tags