Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. याबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेला उत्तसरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवसर देण्यासाठी त्याच गोळीबार मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सहावा दिवस

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. या संपामुळं सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. परंतु, मागण्या मान्य न झाल्याने कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत.

रत्नागिरीतील खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेला उत्तर देण्यासाठी त्याच गोळीबार मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला संबोधित करणार आहेत.

किसान पूत्रांचा उपवास

देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्येची घटना 19 मार्च 1984 रोजी घडली होती. या दिवशी चिलगव्हान ( ता. उमरखेड जि. यवतमाळ ) येथील साहेबराव करपे यांनी सहकुटुंब आपली जीवनयात्रा संपवली होती. या घटनेवला 39 वर्ष झाली आहेत. तरी अद्याप देखील शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. उलट यवतमाळ जिल्हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांना आपण साहेबराव करपे यांच्या स्मृती दिनानिमित्त एक दिवस अन्नत्याग आंदोलन करून थोडा धीर देऊ शकतो का? या एकत्रीकरणाच्या निमित्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही मांडणी, चर्चा होईल. शासन प्रशासनाला थोडी जाग येईल. यासाठी किसानपूत्र आंदोलनतर्फे आज राज्यभर उपवास करून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर आहेत. रूईछत्तीसी येथे दुपारी 1 वाजता त्यांचा नागरी सत्कार होणार आहे. बहुप्रतिक्षित साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता देऊन सर्वेक्षणास दोन कोटी रूपयाचा निधी देखील मंजूर केल्याबद्दल हा भव्य नागरी सत्कार होणार आहे.

बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा

बीड जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा आहे. या मेळाव्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत.

सांगलीत महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन

सांगलीत आज कृष्णनदी काठी दुपारी तीनच्या पुढे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत विरुद्ध इराण मधील पैलवानांच्यात पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे. महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

विशाखापट्टणम येथे भारत-ऑ

from maharashtra https://ift.tt/cQg9eo1
Maharashtra News Live Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
March 18, 2023
0
Tags