Kasba By-election Results 2023 : कसबा आणि चिंचवड (<a href="https://ift.tt/SH23kYG Bypoll Election) पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यात कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. सातव्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. ही जनतेची आघाडी आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते मतांच्या रुपात आपल्याला दिसत आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे हेमंत रासने हे शंकर महाराज समाधी मठात ध्यानाला बसले आहेत.

रवींद्र धंगेकर यांना विजयाचा विश्वास

मतमोजणीला जाण्यापूर्वी कसब्याचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं त्यांच्या पत्नीने औक्षण केलं. घरातील देवाच्या पायापडून त्यांनी मतमोजणीच्या दिवसाची सुरुवात केली आहे. आज मीच विजयी होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. काही वेळातच ते पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन घेऊन ते सगळ्या कार्यकर्त्यांसोबत चहापान करत आहे. मला काहीही टेन्शन नाही आहे. आज मीच बाजी मारणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतपेटीत मतांचा पाऊस, 20 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवेन : रवींद्र धंगेकर

ज्या दिवशी फॉर्म भरला त्याचदिवशी माझा विजय झाला होता. यामुळे भाजप आणि शिंदे गटाने लाखो रुपयांचा पाऊस पाडला. मतपेटीत मतांचा पाऊस पडत आहे. 30 वर्ष जनतेने मला मुलासारखं सांभाळलं. हेमंत रासने यांच्याकडे कमळाचं चिन्ह होतं म्हणून ते निवडून येत होते. चिन्हाशिवाय ते शून्य आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली. तसंच मी 20 हजार मताधिक्याने विजय मिळवेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपची धाकधूक वाढली

पुण्याच्या पेठांमधूनदेखील रवींद्र धंगेकरांना आघाडी मिळाल्यानंतर भाजपची धाकधूक वाढली आहे. शनिवार पेठ आणि बाकी काही पेठांवर भाजपच्या हेमंत रासने यांचं वर्चस्व आहे. मात्र याच भागातून धंगेकर यांनी आघाडी घेतल्याने भाजपचं टेन्शन काही प्रमाणात वाढलं आहे. हेमंत रासने पिछाडीवर असल्याने शंकर महाराज समाधी मठात ध्यानाला बसले. समाधी मंदिरात आल्यानंतर तिसऱ्या चौथ्या फेरीत रासने यांनी आघडी घेतली होती. त्यानंतरच्या फेरीत ते पिछाडीवर आहे. एकीकडे मतमोजणी सुरू दुसरीकडे रासने यांचे देवदर्शन सुरू असल्याचं दिसत आहे.

भाजपचा गड धंगेकर राखणार?

कसबा पेठेतील भाजपचं वर्चस्व असलेल्या सदाशिव पेठे, नारायण पेठ आणि शनिवार पेठेत जनतेचे भाजपला डावलल्याचं दिसत आहे. त्यामुळे या भागातही धंगेकरांनाच जास्त मतं मिळाली आहे. हेमंत रासने यांनी या सगळ्या परिसरात कायम काम केलं आहे. तिथल्या मतदारांचा त्यांना पाठिंबा असतो. मात्र त्याच भागात जनतेने भाजपला पाठिंबा न दिल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजपचा गड धंगेकर राखतील असं म्हटलं जात आहे.

from maharashtra https://ift.tt/CTpdZJ9