Gulabrao Patil : शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चुकीच्या मार्गाने जात असल्याचं आपण त्यांना सांगितलं होतं. मात्र, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जायचं तर जा असं सांगितल्यानं आपणही बाळासाहेबांचे विचार असलेल्या आणि मराठा चेहरा असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतल्याचे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केलं. मंत्री पदाचा सट्टा लाऊन आम्ही तो निर्णय घेतला असल्याचं पाटील म्हणाले. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा इथे विकासकामांचं उद्धाटन तसेच भूमीपूजन सोहळ्याचं आयेाजन करण्यात आलं होतं. यावेळी पाटील बोलत होते.

राष्ट्रवादीचे देवकर माझ्यामुळेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले होते

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांना माझ्यामुळेच एक वर्ष जिल्हा बँकेत अध्यक्षपदाची संधी मिळाली होती, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. आज संजय पवार हे सुध्दा माझ्यामुळेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्याचे पाटील म्हणाले. मी बोललो नसतो, अथवा आमच्या सात लोकांनी पाठींबा दिला नसता तर गुलाबराव देवकर हे अध्यक्ष झालेच नसते. एक गुलाब ने दुसरे गुलाब को मदत किया असेही पाटील म्हणाले.

जळगाव ग्रामीण मतदारसंघाला चांगले दिवस

दरम्यान, गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यानं जळगावच्या राजकीय वुर्तळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचं पाठबळ कसं? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. देवकर हे जळगाव ग्रामीण मतदारसंघातले होते. आताचे अध्यक्ष संजय पवार हे सुध्दा जळगाव ग्रामीण मतदारसंघातले आहेत. सध्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाला चांगले दिवस असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

असा मुख्यमंत्री आपल्याला कुठेही सापडणार नाही

सात महिन्यात पाच वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावात आले, हा जोक नाही. असा मुख्यमंत्री आपल्याला कुठेही सापडणार नाही. सकाळी पाच वाजेपर्यंत काम करतात, साधारण माणूस आहे, एकच ड्रेसमध्ये राहतात असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर गुलाबराव पाटलांनी स्तुतीसुमने उधळली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 संचालक असतानाही त्यांचा अध्यक्ष नाही

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजय पवार हे विजयी झालेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 संचालक असतानाही त्यांना त्यांचा अध्यक्ष करता आला नाही. टांगा पलटी घोडे फरार झाले. दरम्यान, आणखी मलाच अध्यक्ष राहू दिलं असतं तर बरं झालं असतं असं वक्तव्य आधीचे अध्यक्ष गुलाबराव देवकर हे यांनी केल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. यावेळी गुलाबराव पाटील यांन राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/bhDguVw Patil : राष्ट्रवादीच्या नाराज लोकांनी साथ दिल्यानं संजय पवारांचा विजय : गुलाबराव पाटील

from maharashtra https://ift.tt/6fuWNPe
Gulabrao Patil : मंत्री पदाचा सट्टा लाऊन आम्ही तो निर्णय घेतला : गुलाबराव पाटील
March 11, 2023
0
Tags