Maharashtra Budget Session : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) शेवटचा आठवडा सुरु आहे. येत्या 25 तारखेला म्हणजे शुक्रवारी अधिवेशचा शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान, विविध मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात धारेवर धरले आहे. आजही शेतकरी प्रश्नांसह इतर मुद्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव देखील येणार आहे.

मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात समाजवादी पार्टीचे आमदार आंदोलन करणार

अवकाळीमुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभं पिकं वाया गेली आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना लगेच आर्थिक मदत मिळावी यासाठी आजही विरोधक सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, समाजवादी पार्टीच्या आमदारांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्री लोढा यांनी सभागृहात लव्ह जिहादबद्दल चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप करत सपा आमदार आज आंदोलन करणार आहेत.

राज्यातील कायदा, सुव्यवस्थेबाबत चर्चा होणार

दरम्यान, आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव येणार आहे. यावेळी राज्यातील कायदा, सुव्यवस्था यावरती विधानसभेत चर्चा होणार आहे. तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी झालेल्या हिंसेच्या घटना, बलात्काराच्या घटना, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरत विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसाचा मोठा फटका

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढली आहे. यासंदर्भात विधानसभेत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा चौथा आठवडा सुरु आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून विविध प्रश्नांवरुन विरोधक विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करत आहेत. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/kbHB4Sj Session: 'खोक्यांची पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे', विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

from maharashtra https://ift.tt/l40TLFH
Budget Session : आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव येणार, शेतकरी प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
March 22, 2023
0
Tags