Ads Area

Ashok Chavan : अवकाळीमुळे नांदेड जिल्ह्यातील पिकं जमीनदोस्त, शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मागणी

Ashok Chavan : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. नांदेड (<a style="color: #0014ff;" href="https://ift.tt/8Ec5jLZ) जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार अशोक चव्हाण (<a href="https://ift.tt/3sKbwXZ Chavan) नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Abhijit Raut) यांच्याशी संपर्क करुन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. अशोक चव्हाण हे आज (17 मार्च) नांदेडमध्ये येणार असून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत.

अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा आडव्या

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, अर्धापूर, नांदेड या तालुक्यातील बहुतांश गावांना अवकाळी पावसाचा मोठा फटका  बसला आहे. केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. टरबूज, खरबूज पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रानात गारांचा खच पडला होता. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी अशोक चव्हाण आज करणार आहेत. दरम्यान, याबाबत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. तसेच सर्व यंत्रणा कामाला लावून पंचनामे करण्याच्या सूचनाही अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिल्या.

रब्बी पिकं जमीनदोस्त

पाऊस आणि गारपिटीमुळे नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी केळीच्या बागांचे मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर अन्य पिके पाण्याखाली बुडाली आहेत. शेतकऱ्यांचे शेतातील टिनशेड या वादळी वाऱ्यात उडून गेल्याने बारड परिसरात हाहाकार उडाला आहे. तसेच गहू, ज्वारी, हरभरा या रब्बींच्या पिकांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. वादळी वारा आणि जोरदार झालेल्या पावसामुळे गहू आणि ज्वारीची पिके जमीनदोस्त झाली आहेत.

राज्यात 20 मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता

सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मानवी आरोग्यासही परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20 मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/8DozJ9V Rain : राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना मोठा फटका, बळीराजा चिंतेत

from maharashtra https://ift.tt/ugRlmiv

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area