Ads Area

Agriculture News : नंदुरबारमध्ये नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांची पाठ, बाजार समितीत आवक वाढली

Nandurbar Agriculture News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात नाफेडच्या (Nafed) वतीनं हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यासाठी नाव नोंदणीही करण्यात येत आहे. मात्र, नाफेडच्या हरभरा (Gram) खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. नंदुरबार बाजार समितीत (Nandurbar Market Committee) शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्यानं शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे हरभरा विक्रीस प्राधान्य देत आहे. त्यामुळं बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक प्रचंड वाढली आहे.

शहादा खरेदी केंद्रावर 622 तर नंदुरबारच्या खरेदी केंद्रावर अवघ्या 22 शेतकऱ्यांची नोंदणी

हरभरा खरेदीसाठी नंदुरबार आणि शहादा अशी दोन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र, सध्या नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसत आहे. शहादा खरेदी केंद्रावर 622 तर नंदुरबारच्या खरेदी केंद्रावर अवघ्या 22 शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केल्याची माहिती मिळाली आहे. सध्या खुल्या बाजारात खासगी व्यापारी हरभाऱ्याला चांगला दर देत आहेत. त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळं शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी नेत आहेत. गेल्या काही  दिवसापूर्वी खासगी व्यापारी हमीभावापेक्षा हरभऱ्याला कमी दर देत होते. मात्र, आता हरभऱ्याच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत आहे.

मेक्सिकन वाणाला 10 हजारांचा तर गावरानी वाणाला 5 हजार रुपयापर्यंतचा दर

दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने नाफेडमार्फत हरभरा खरेदी सुरू केली जाते. त्याचप्रमाणे यावर्षीही हरभरा खरेदी सुरु झाली आहे.  शेतकरी सध्या खासगी व्यापाऱ्यांना हरभरा विक्रीस प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. नंदुरबार बाजार समिती बीकेव्हीटू या वाणाला सात हजार दोनशे ते सात हजार आठशे रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. तर मेक्सिकन वाणाला दहा हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. तर गावरानी स्थानिक वाणाला चार हजार आठशे ते पाच हजार रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिकेही टू या वाणाची लागवड होत असते. या वाणाला शासनाच्या हमीभावापेक्षा जास्त दर आहे. नाफेडने हरभरा खरेदी केल्यानंतरही शेतकऱ्यांना हरभरा विक्रीच्या पैशासाठी आठ ते पंधरा दिवसाची प्रतीक्षा करावी लागते असा मागील वर्षाचा अनुभव आहे. शेतकऱ्यांनी यावेळी खासगी व्यापाऱ्यांना हरभरा विक्रीला प्राधान्य दिल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/bhzaTro News : नाफेडकडून हरभरा खरेदी नोंदणीस मुदतवाढ, 31 मार्चपर्यंत करता येणार नोंदणी

from maharashtra https://ift.tt/LItGKnz

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area