Ads Area

6th March In History : चंद्रशेखर यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांची पहिली भेट; आज इतिहासात

On This Day In History : आजचा दिवस देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या नावाशी जोडला गेला आहे. 6 मार्च 1991 रोजी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. चंद्रशेखर हे अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थी जीवनात समाजवादी चळवळीत सामील झाले होते. 1977 ते 1988 या काळात ते जनता पक्षाचे अध्यक्ष होते. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील इब्राहिमपट्टी गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चंद्रशेखर यांनी 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 या काळात अल्पकाळ पंतप्रधानपद भूषवले. त्यांनी 6 मार्च 1991 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

1915: महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांची शांतिनिकेतनमध्ये पहिल्यांदा भेट झाली (Mahatma Gandhi and Rabindranath Tagore)

आजचा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे, कारण या दिवशी महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांची पहिल्यांदा शांतिनिकेतन येथे भेटले झाली. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांची पहिली भेट 6 मार्च 1915 रोजी झाली होती. गांधी 1915 ते 1945 दरम्यान आठ वेळा शांतिनिकेतनला गेले. 17 फेब्रुवारी 1915 रोजी ते पत्नी कस्तुरबासोबत पहिल्यांदा शांतीनिकेतनला पोहोचले, पण टागोर त्यावेळी कलकत्त्याला होते, त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. पहिल्यांदा शांतिनिकेतनमध्ये पोहोचल्यानंतर गांधी म्हणाले, 'आज मी जे आनंद अनुभवत आहे, ते मला कधीच जाणवले नाही. रवींद्रनाथ इथे नसले तरी त्यांचे अस्तित्व माझ्या हृदयात जाणवते. तुम्ही भारतीय पद्धतीने स्वागताची व्यवस्था केली आहे, हे जाणून मला आनंद झाला. यानंतर 6 मार्च 1915 रोजी महात्मा गांधी दुसऱ्यांदा शांतिनिकेतनला पोहोचले, त्यावेळी त्यांची पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर यांची भेट झाली. या भेटीत टागोर आणि गांधी एकत्र बसलेले अनेक फोटो आजही उपलब्ध आहे.

1982: रामभाऊ म्हाळगी यांची पुण्यतिथी (Ramchandra Kashinath Mhalgi)

रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि पक्षाचे विधानसभेतील पहिले आमदार होते. ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून 1977 साली व 1980 साली ते ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून गेले होते.

1997: अभिनेत्री जान्हवी कपूरचा जन्मदिन (Janhvi Kapoor Birthday)

बॉलीवूडमध्ये एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवणारी जान्हवी कपूरचा आज वाढदिवस आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांसारख्या दिग्गजांची मुलगी जान्हवी आपल्या सौंदर्य आणि प्रतिभेच्या बळावर इंडस्ट्रीत ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे. एक अभिनेत्री असूनही श्रीदेवीला तिच्या मुलीने म्हणजेच जान्हवीने फिल्म लाईनमध्ये करिअर करावे असे वाटत नव्हते. याचा खुलासा स्वतः जान्हवीने केला आहे. जान्हवीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या आईला तिने बॉलिवूडमध्ये करिअर करावे असे वाटत नव्हते, जान्हवीने डॉक्टर व्हावे अशी तिची इच्छा होती. पण जान्हवीला बॉलीवूड स्टार बनायचे होते आणि ती झालीही. धडकच्या यानंतर जान्हवीने रुही, मिली, गुडलक जेरी सारख्या चित्रपटात काम केलं. गुजन सक्सेना या चित्रपटासाठी तीच खूप कौतुक झालं.

from maharashtra https://ift.tt/hQi1apJ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area