Ads Area

4th March In History : INS विक्रांत भारतीय नौदलात दाखल, चलत चित्रपट प्रवर्तक हरीश्चंद भाटवडेकर यांचा जन्म, अभिनेता इफ्तिखार यांचे निधन; आज इतिहासात

On This Day In History : इतिहासाच्यादृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. 4 मार्च ही तारीख इतिहासाच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. आजच्या दिवशी INS विक्रांत भारतीय नौदलात दाखल झाली. तर, चित्रपट उद्योग सुरू होण्याआधी चलत चित्रपट प्रवर्तक हरीश्चंद भाटवडेकर यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. चरित्र अभिनेते इफ्तिखार यांचे निधनही आजच्या दिवशी झाले. जाणून घेऊयात आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं?

1861 : अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड

लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही ही लोकशाहीची व्याख्या करणारे अब्राहम लिंकन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. ते अमेरिकेचे 16 वे आणि रिपब्लिकन पक्षाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेचे सर्वात लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष म्हणून आजही त्यांचा उल्लेख होतो. अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गुलामगिरीच्या समर्थनात असलेल्यांनी त्यांची 1965 मध्ये हत्या केली.

1868 : चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म

भारतातील चलत चित्रपटाचे प्रवर्तक समजले जाणारे  हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म. मुंबईतील केनेडी ब्रिज येथे त्यांचा स्वत: चा स्टुडिओ होता.  वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. फ्रान्सच्या ल्युमिएर बंधूंनी 1896 मध्ये त्यांना काही लघुपट दाखवले. त्यानंतर त्यांना या कलामाध्यमाबद्दल आकर्षण वाटले. पुढे त्यांनी प्रोजेक्टर विकत घेतले आणि काही लघुपट हे श्रीमंतांना दाखवण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वत: कॅमेरा विकत घेऊन त्यांनी लघुपट चित्रीत केले. त्यावेळी त्यांनी मुंबईतील काही घडामोडी, कामांचे चित्रीकरण करून थिएटरमध्ये लघुपट दाखवू लागले. ब्रिटीश सरकारचे काही कार्यक्रमांचेदेखील त्यांनी चित्रीकरण केले.

1961 : आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात दाखल

इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात दाखल झाली. आयएनएस विक्रांत ही अनेक भारतीय नौदलाची मुख्य ताकद होती. गोवा मुक्तिसंग्रामात आयएनएस विक्रांत सहभागी होती. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात विक्रांतने मोठी कामगिरी बजावली होती.

1976 : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचे निधन

वॉल्टर शॉटकी हे जर्मन भौतिकशास्त्रत्र होते. इलेक्ट्रॉन आणि आयन उत्सर्जन घटनेचा सिद्धांत विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी 1915 मध्ये सिमेन्समध्ये काम करत असताना स्क्रीन-ग्रीड व्हॅक्यूम ट्यूबचा शोध लावला. 1924 मध्ये डॉ. एर्विन गेर्लाच सोबत रिबन मायक्रोफोन आणि रिबन लाउडस्पीकरचा सह-शोध लावला. त्यानंतर सेमीकंडक्टर उपकरणे, तांत्रिक भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले.

1995 : चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचे  निधन

बॉलिवूड चित्रपटांमध्ये पोलिसांचा कणखर चेहरा अशी ओळख मिळालेले चरित्र अभिनेते इफ्तिखार यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जालंधर येथे जन्म झाला होता. 1944 मध्ये त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. फाळणीनंतर इफ्तिखार यांचे कुटुंब, भाऊ पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत झाले. तर, इफ्तिखार यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. बंदिनी, खेल खेल में, एजंट विनोद यासारख्या चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारल्या होत्या. 1967 मधील अमेरिकन टीव्ही मालिका 'माया'मधील दोन भागांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.

2000 : स्वातंत्र्यसेनानी, खासदार गीता मुखर्जी यांचे निधन

स्वातंत्र्यसेनानी, खासदार गीता मुखर्जी यांचे निधन. गीता मुखर्जी या स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सभासद होत्या. 1967 ते 1977 या दरम्यानच्या कालावधीत चार वेळेस आमदार आणि 1980 ते 2000 पर्यंत पनस्कूरा मतदारसंघातून सलग आठ वेळेस लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या. संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे, यासाठी मागणी करणाऱ्या प्रमुख महिला नेत्या होत्या.

from maharashtra https://ift.tt/JGBjTXS

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area