Ads Area

Sambhajiraje : सरकार विरोधात लढा उभारून मोठा दणका देणार, संभाजीराजेंचा इशारा, वाचा नेमकं काय म्हणाले....

Sambhajiraje Chhatrapati : पैसे द्यायचे असतील तर जिवंत स्मारक असणाऱ्या गडकोट किल्ल्यांसाठी द्या असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केलं. आता मी दमलो असून, थोड्याच दिवसात सरकार विरोधात मोठा लढा उभारणार असून मोठा दणका देणार असल्याचा इशारा संभाजीराजेंनी दिला. इंदापूरातील (Indapur) भिगवणमध्ये अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या
(Maratha Seva Sangh) वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे उद्घाटन संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी कोठून पैसे आणणार?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते सहा वर्षापूर्वी जलपूजन पार पडले. मात्र, अद्याप ते काम झाले नाही. त्यावेळी 3 हजार कोटी रूपयाचे ते बजेट होते. आता ते 30 हजार कोटी रुपयाचे झाले असेल. कोठून पैसे आणणार आहेत? असा प्रश्न देखील संभाजीराजेंनी उपस्थित केला. हा लोकांना फसवण्याचा प्रकार असून तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर जिवंत स्मारक असणाऱ्या गडकोट किल्ल्यांसाठी द्या असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

Sambhajiraje Chhatrapati on Govt : आजी-माझी मुख्यमंत्र्यांना 50 ने 100 पत्र लिहिले

देश स्वतंत्र झाल्यापासून रायगडावर फक्त सव्वा कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रत्येकजण रायगडाचे नाव घेतो रायगडाची दुरुस्त झाली असं सांगतो, परंतू कोणतेच सरकार त्यावर खर्च करत नाही अशी खंत संभाजीराजेंनी बोलून दाखवली. सध्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तसेच माझी मुख्यमंत्र्यांना 50 ने 100 पत्र लिहिले आहेत. त्यांना सांगितले आहे की सी पोर्ट टुरिझम करा परंतू, त्यांना ते करण्यासाठी वेळ नाही असे म्हणत संभाजीराजेंनी (Sambhajiraje) आजी आणि माजी सरकारवर निशाणा साधला आहे.

Sambhajiraje Chhatrapati on Swarajya : बिघडलेल्यांना नीट करण्यासाठी स्वराज्यची स्थापना

दरम्यान, यावेळी बोलताना संभाजीराजेंनी सरकारला इशारा दिला. जे जे बिघडलेत त्यांना नीट करण्यासाठी स्वराज्यची (Swarajya) स्थापना केली आहे. स्वराज्याच्या माध्यमातून जे जे बिघडलेले आहे त्यांना सरळ कसं करायचे हे स्वराज्यने ठरवल्याचे संभाजीराजे (Sambhajiraje) म्हणाले. तसेच थोड्याच दिवसात सरकार विरोधात मोठा लढा उभारणार असून मोठा दणका देणार असल्याचा इशरा संभाजीराजेंनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/UaTQM8o Chhatrapati: "...याचे परिणाम भोगावे लागतील"; छत्रपती शिवरायांबाबतच्या वक्तव्यावरुन संभाजीराजेंनी आव्हाडांना थेट सुनावलं

from maharashtra https://ift.tt/en89wNR

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area