Ads Area

Ravikant Tupkar : लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, तुपकरांचे पोलिस स्थानकातच अन्नत्याग आंदोलन

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani shetkari Sanghatana) रविकांत तुपकरांसह (Ravikant Tupkar) दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल रविकांत तुपकर यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांनी पोलिस स्थानकातच अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. जोपर्यंत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नसल्याची भूमिका रविकांत तुपकरांनी घेतलीय.

रविकांत तुपकरांचा आत्महदनाचा प्रयत्न

रविकांत तुपकरांनी कालपासून जेवण केलेले नाही, त्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.  सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या 200 कार्यकर्त्यांचाही अन्नत्याग आंदोलनात सहभाग आहे.

तुपकरांसह 18 जणांवर गंभीर गुन्हे दाखल

काल झालेल्या बुलढाण्यातील आंदोलन प्रकरणी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह इतर 18 जणांवर बुलढाणा शहर पोलिसांनी दंगल करणे, शासकीय कामात अडथळा आणणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासोबत इतरही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना अज्ञातस्थळी पोलीस कोठडीत ठेवले आहे

पोलिसांकडून लाठीचार्ज

गेल्या काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकरांनी कापूस, सोयाबीन आणि पीकविम्याच्या प्रश्नांवरुन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांकडून तुपकर यांचा शोध सुरु होता. आंदोलनाचा इशारा देऊन तुपकर भूमिगत झाले होते. काल तुपकर येण्याआधीच शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते. तुपकर पोलीसी वेशात येताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा गदारोळ झाला आणि पोलिसांची धावपळ उडाली. तुपकरांना आत्मदहनापासून रोखल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ते आंदोलनला बसले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.  त्यानंतर कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

रविकांत तुपकरांच्या नेमक्या मागण्या काय?

सोयाबीन, कापसाला दरवाढ द्यावी

सरकारच्या दुर्लक्षामुळं 70 ते 80 टक्के सोयाबीन, कापूस घरात पडून

पीक विम्याची रक्कम मिळावी

अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/fMicPov Tupkar : रविकांत तुपकर पोलिसांच्या वेशात, अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष

from maharashtra https://ift.tt/wqFR23y

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area