Ads Area

Ravikant Tupkar : अल्टिमेटम संपला, तुपकरांची पुढची भूमिका काय? मुंबई किंवा बुलढाण्यात वातावरण चिघळण्याची शक्यता

Ravikant Tupkar : कापसासह (cotton) सोयाबीन (soybean) आणि पीक विम्याच्या (Pik Vima) प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर आक्रमक (Ravikant Tupkar) झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून तुपकर हे भूमिगत आहेत. पोलिसांकडून त्यांची शोधाशोध सुरु आहे. दरम्यान, त्यांनी कापूस सोयाबीन आणि पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात सरकारला 10 फेब्रुवारीचा अल्टिमेटम दिला होता. तो अल्टिमेटम आता संपला आहे. त्यामुळं आज रविकांत  तुपकर हे शेतकऱ्यांसह बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा मुंबईच्या AIC पीक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

पोलिसांचं टेन्शन वाढलं

शेतकरी प्रश्नासंदर्भात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी 10 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा AIC विमा कंपनीच्या मुंबई स्थित कार्यालयासमोर  शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या दिवसापासून रविकांत तुपकर हे भूमिगत आहे. ते नेमके कुठे आहेत, याबबातची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी त्यांची शोधाशोध सुरु केली आहे. ते भूमिगत झाल्यामुळं पोलिसांचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान, तुपकरांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपला आहे. त्यामुळं आज ते नेमकी काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कापूस सोयाबीनला दरवाढ नाही, पीक विमा मिळाला नाही

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केली असल्याचा तुपकरांनी म्हटलं होतं. हजार शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावर उतरत आहोत. सरकारने वेळोवेळी आमच्यासोबत चर्चा, बैठका केल्या. सरकारने आम्हाला आश्वासनं दिली, त्यांनी आमची फसवणूक केली आहे. कापसाला, सोयाबीनला दरवाढ मिळत नाही. 70 ते 80 टक्के सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. तरीही सरकार चर्चा करायला तयार नसल्याचं तुपकरांनी सांगितले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याच तुपकरांनी म्हटलं आहे.

आमचं जगण मान्य करा नाहीतर आम्हाला मारुन टाका

11 फेब्रुवारीला हजारो शेतकरी बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर किंवा AIC विमा कंपनीच्या मुंबई स्थित कार्यालयासमोर  येणार आहोत. एकतर आम्हाला आत्मदहन करु द्या, नाहीतर पोलिसांच्या बंदुकांच्या गोळ्यांनी आम्हाला शहीद करा. आमचं जगण मान्य करा नाहीतर आम्हाला मारुन टाका अशी आमची भूमिका असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/fS4aCcM Tupkar : रविकांत तुपकर तीन दिवसांपासून भूमिगत, प्रशासनाचं टेन्शन वाढलं; आत्मदहन करण्याचा इशारा

from maharashtra https://ift.tt/UbzRvYH

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area