Pradnya Rajeev Satav : दिवंगत खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यावर कसबे दवंडा या गावामध्ये एका व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हल्लाखोरावर रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलिसांमध्ये (Akhara Balapur Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्ञा सातव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्हाला हल्ला करून घरी बसण्याचा कट असू शकतो अशी प्रतिक्रिया प्रज्ञा सातव यांनी दिली.

कसबे दवंडा या गावांमध्ये एका व्यक्तीने आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला केला आहे. ही माहिती प्रज्ञा सातव यांनी स्वतः फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करून दिली आहे. या प्रकरणामध्ये आखाडा बाळापूर पोलिसांनी तत्काळ हल्लाखोराला ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणांमध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्हाला हल्ला करून घरी बसण्याचा कट असू शकतो. महिला प्रतिनिधी आहे, भीती दाखवली की घाबरुन घरी बसतील या कारणाने हा हल्ला झाल्याचं प्रज्ञा सातव यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितल.

नेमकं काय म्हणाल्या प्रज्ञा सातव

कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर असताना माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीने मागून हल्ला केला. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कोणाचेही वाईट केले नाही. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहणार. कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता.

या प्रकरणी आमदार प्रज्ञा सातव यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, आज संध्याकाळी 8 वाजता कसबे दवंडा या गावी असताना एक अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीजवळ आला. नियोजित कार्यक्रमाच्या स्थळी असताना, मी भाषण देत असताना एक व्यक्ती मागून आला, मला त्यानं ओढलं आणि हल्ला केला. समोर असलेल्या लोकांनी या व्यक्तीला पकडलं आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/2DwtViX Rajeev Satav : राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला, हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट

from maharashtra https://ift.tt/VE0LnN1
Pradnya Satav : आमदार प्रज्ञा सातव हल्ला प्रकरण, हल्लाखोरावर आखाडा बाळापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल
February 08, 2023
0
Tags