ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.

पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In Mumbai) यांचा मुंबई दौरा आहे. एका महिन्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्याशिवाय, पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यात इतरही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाचे कार्यक्रम...

मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. दुपारी तीन वाजता पंतप्रधानांचे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आगमन होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

- आज सकाळी ११ वाजता संत गुरु कांचनगिरी माता राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' येथे भेट घेणार आहेत

- पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यू प्रकरणी आज मुंबईत पत्रकार संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. पत्रकारांचे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे.

पुणे
- चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर दोन्ही विधानसभा मतदार संघाच चित्र स्पष्ट होणार आहे.

अहमदनगर
- कोरोनामुळे तीन वर्षांपासून होऊ न शकलेले जिल्हा परिषदेचे साईज्योती बचतगटांचे प्रदर्शन यंदा 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान अहमदनगर शहरातील न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. यंदा यात कृषी महोत्सव आणि पशू प्रदर्शन यांचाही समावेश असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार सुजय विखेंचीही उपस्थिती होणार आहे. जगातील सर्वाधिक उंचीचा आणि तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेला हरियाणातील मुरा जातीचा बारा कोटी रुपये किंमतीचा दारा नावाचा रेडा या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे.

- मुंबईवरून सुटणाऱ्या वंदे भारत रेल्वेचे शिर्डी रेल्वे स्थानकावर आगमन होणार असून साईबाबा संस्थान आणि भाजपच्यावतीने प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार आहे.

नाशिक

- भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे. या बैठकीचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होणार आहे. रात्री 9.30 वाजल्यानंतर फडणवीस कार्यक्रमाला येतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी करणे, सरकारची कामकाज जनतेपर्यंत पोहचविणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे तीन दिवसीय महाअधिवेशन शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे.

- कादवा सहकारी साखर कारखाना इथेनॉल प्रकल्पाचे सायंकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

from maharashtra https://ift.tt/pZT6wRM
Maharashtra News Live Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
February 09, 2023
0
Tags