Ads Area

Bhiwandi Fire : भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, यंत्रमाग कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना जळून खाक

Bhiwandi Fire : भिवंडीत (Bhiwandi) आगीचे सत्र सुरूच असून, पुन्हा अग्नितांडाव पाहायला मिळाला. शहरातील देवजीनगर (Devjinagar) परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ए.डी. टेक्सटाईल या यंत्रमाग कारखान्याला अचानक भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कच्चे कापड आणि यंत्रमाग होते. आग एवढी भीषण होती की आगीच्या भक्ष्यस्थानी संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे.

तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

ए.डी. टेक्सटाईल यंत्रमाग कारखाना हा दाटीवाटीच्या परिसरात असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. आग इतकी भीषण होती की आगीचे लोळ वरपर्यंत दिसत होते. त्यामुळं परिसरात आग पसरते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आलं होतं. भिवंडी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल होऊन या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. परंतू, आग इतकी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळवणं सहजासहजी शक्य नव्हते. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

कापड कारखान्यांमध्ये आग नेमकी कशी लागली हे स्पष्ट नाही

दरम्यान, या कापड कारखान्यांमध्ये आग नेमकी कोणत्या कारणानं लागली हे अजूनही स्पष्ट झालं नाही. परिसरात आग पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांकडून तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दरम्यान, भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आगी नेमक्या लागतात कशा याचीही माहिती समोर येणं महत्वाचं आहे. त्यामुळं या आगीच्या घटनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/1iuUW2Q News: सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीतील रबर कारखान्याला भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू, आगीचं कारण अस्पष्ट

from maharashtra https://ift.tt/1pqlyhZ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area