Aurangabad : उस्मानाबादचं (Osmanabad) नामकरण 'धारशिव' करण्यास हरकत नाही. मात्र, औरंगाबादचे (Aurangabad) 'संभाजीनगर' असं नामकरण करण्याची प्रक्रिया अद्याप विचाराधीन असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (High Court) नामांतराच्या मुद्यावरील माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.

नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

जुलै 2022 मध्ये औरंगाबादचं 'छत्रपती संभाजीनगर' असं तर उस्मानाबादचं 'धाराशिव' असं नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे या तीन व्यक्तींनी मिळून ही याचिका दाखल केली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं राजकीय फायद्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या अंतिम बैठकांमध्ये या दोन शहरांच्या नामकरणाचा ठराव बेकायदेशीरपणे मांडला. त्यानंतर 16 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वाखालील सरकारनं या नामकरणावर शिक्कामोर्तब केला. मात्र राज्य सरकारचा हा निर्णय राज्यघटनेतील संबंधित तरतुदींचं उल्लंघन आहे. तसेच या निर्णयाने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. या याचिकेवर बुधवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी उस्मानाबादचं नामकरण धारशिव करण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने सांगितले. मात्र, औरंगाबादचे नामकरण करण्याची प्रक्रिया अद्याप विचाराधीन असल्याचं सरकारनं सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

पुन्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

from maharashtra https://ift.tt/1Foi0q3
Aurangabad : उस्मानाबादचं नामकरण 'धाराशिव' करण्यास हरकत नाही, मात्र औरंगाबादचा विचार सुरु; केंद्र सरकारची न्यायालयात माहिती
February 15, 2023
0
Tags