Abhijeet Bichukale : 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) धमकीचा फोन आला असून त्याने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) लेखी तक्रार दाखल केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. धमकीनंतर आता तात्काळ संरक्षण देण्याची मागणी बिचुकलेने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

अभिजित बिचुकले आणि लहुजी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात मंगळवारी निवडणूक कार्यालयासमोर बाचाबाची झाली होती. अभिजित बिचकुले त्यांची पत्नी अलंकृता बिचुकले आणि लहुजी छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे हे लहुजी संघटनेचे उमेदवार अनिल हातगडे हे उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले असता या दोघांमध्ये बाचाबाची झाली होती.

from maharashtra https://ift.tt/2qhPezk
Abhijeet Bichukale : 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन; निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार
February 07, 2023
0
Tags